नव्या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत दोन दहशतवादी हल्ले करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. न्यू ऑर्लिन्समध्ये एक माथेफिरूने एक ट्रक वेगाने गर्दीत घुसविला. यात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर एलन मस्क यांच्या कंपनीचा टेस्ला सायबर ट्रकमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. हे दोन्ही ट्रक एकाच वेबसाईटवरून भाड्याने घेतल्याचा आरोप मस्क यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
लास वेगासमधील ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलबाहेर सायबर ट्रकमध्ये ब्लास्ट घडविण्यात आला आहे. मस्क यांनी या दोन्ही घटनांमध्ये लिंक जोडली असून तपास यंत्रणांच्या सुया तिकडे वळविल्या आहेत. सायबर ट्रक आणि आत्मघातकी एफ १५० ट्रक रेंटल वेबसाईट टुरोवरून भाड्याने घेण्यात आले होते. यामुळे या दहशतवादी घटना आहेत. कुठे ना कुठे या दोघांचा संबंध असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे.
तसेच सायबर ट्रकमध्ये आपणहून स्फोट झालेला नाहीय. त्यात विस्फोटके, फटाके सदृष्य वस्तू होत्या, असाही दावा मस्क यांनी केला आहे. या सायबर ट्रकबाबतचे सीसीटीव्ही फुटेज मस्क यांनी एफबीआयला दिले आहेत. टेस्लाच्या चार्जिंग स्टेशनवर हा ट्रक गेला होता. तसेच स्फोटावेळी कारमध्ये काही समस्याही सर्व्हरवर नोंद झाली नाहीय, असे मस्क यांनी म्हटले आहे.
सायबर ट्रक स्फोटात एका व्यक्तीचा जो चालक होता त्याचा मृत्यू झाला आहे. तर आजुबाजुला उपस्थित असलेले सात जण जखमी आहेत. एफबीआय तपास करत असून यात फटाके, गॅसची टाकी आणि इंधनाचे अवशेष मिळाले आहेत.