शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

294 कोटी रुपयांच्या आलिशान घरात राहणार इलॉन मस्कची 11 मुले, हजारो स्क्वेअर फूटची जागा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:49 IST

इलॉन मस्क यांनी आपल्या कुटुंबासाठी एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क (Elon Musk) त्यांच्या व्यावसायासह वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. फार कमी लोकांना माहित आहे की, इलॉन मस्क यांना 11 आपत्ये आहेत. मस्क यांना आपल्या सर्व 11 मुलांना एकाच घरात ठेवायचे आहे. यासाठी त्यांनी एक आलिशान घर खरेदी केले आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मस्क यांनी 14,400 स्क्वेअर फूटची हवेली खरेदी केली आहे. त्यांची 11 मुले या हवेलीत एकाच छताखाली राहतील. हे नवीन घर इलॉन मस्क यांच्या घरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. घराजवळ असल्याने ते आपल्या मुलांसोबत वेळ घालवू शकणार आहे. या हवेलीची किंमत सुमारे 294 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील टेक्सासमधील ऑस्टिन नावाच्या ठिकाणी मस्कने ही मालमत्ता खरेदी केली आहे.

इलॉन मस्क यांचे कुटुंबइलॉन मस्क यांच्या पहिल्या पत्नीचे नाव जस्टिन मस्क असून, तिच्यापासून मस्क यांना सहा मुले झाली. त्यांचे पहिले मूल, नेवाडा बालपणातच मरण पावले. नंतर त्यांना आयव्हीएफद्वारे पाच मुले झाली. यामध्ये ग्रिफिन आणि व्हिव्हियन आणि सॅक्सन, डॅमियन आणि काई या तिघांचा समावेश आहे.दरम्यान, मस्क यांनी अभिनेत्री तालुलाह रिलेशी दोनदा लग्न केले आणि घटस्फोटही घेतला. मात्र, या नात्यात त्यांना मूल झाले नाही. यानंतर संगीतकार ग्रिम्ससोबत मस्क यांनी आणखी तीन मुलांना जन्म दिला. ग्रिम्सचे खरे नाव क्लेअर बाउचर आहे. मस्क आपल्या मुलांच्या ताब्याबाबत कायदेशीर लढाई लढत आहेत.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कInternationalआंतरराष्ट्रीयtechnologyतंत्रज्ञानTeslaटेस्ला