शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

“४० तास ऑफिसमध्ये काम करा, अन्यथा नोकरी सोडा”; इलॉन मस्कची टेस्ला कर्मचाऱ्यांना ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:02 IST

इलॉन मस्क यांनी टेस्ला कर्मचाऱ्यांना ई-मेल केले असून, त्यातून थेट इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली: जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती तसेच टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे मालक इलॉन मस्क सध्या अनेकविध विषयांमुळे चर्चेत आहेत. यातच आता टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना इलॉन मस्क यांनी सक्त ताकीद दिल्याचे समोर आले आहे. इलॉन मस्क यांच्या या विधानाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. टेस्लाच्या कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन ४० तास काम करावे, अन्यथा कंपनी सोडावी, अशी ताकीद इलॉन मस्क यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. 

कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. यातच अनेकविध क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केले आहे. काही कंपन्यांनी हायब्रीड योजना राबवली आहे. मात्र, यातच आता मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना एक ई-मेल पाठवला आहे. यात त्यांनी कर्मचाऱ्यांना काम करण्याच्या तासाबद्दल सूचना केल्या आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना थेट इशाराही इलॉन मस्क यांनी दिला आहे.

गोपनीय ई-मेल लीक झाला

टेस्ला कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या इलॉन मस्क यांचा ई-मेल  गोपनीय असल्याचे सांगितले जात होते. मात्र, हा ई-मेल आता लीक झाला आहे. इलॉन मस्क यांनी आपल्या ई-मेल मध्ये म्हटले की, रिमोट वर्क करणे आता योग्य नाही. जर कुणाला रिमोट वर्क करायचे असेल तर त्याला ऑफिसला यावे लागणार आहे. तसेच कार्यालयात कमीत कमी एका आठवड्यात ४० तास काम करावे लागणार आहे. जर कोणी कर्मचारी ४० तास काम करण्यास तयार नसेल, तर त्या व्यक्तीने टेस्ला कंपनीला सोडून द्यावी, असा इशारा इलॉन मस्क यांनी ई-मेलमधून कर्मचाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, इलॉन मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दोन ई-मेल पाठवले असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या ई-मेलमध्ये सूचनांसह काही अटी देण्यात आल्या आहेत. याअंतर्गत काही कर्मचाऱ्यांना रिमोट वर्क करण्याची परवानगी दिली जाणार आहे. दुसऱ्या ई-मेलमध्ये मस्क यांनी लिहिले की, कर्मचाऱ्यांना टेस्लाला ऑफिसमध्ये यावे लागणार आहे. सोबत वरिष्ठ कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांच्या तुलनेत ऑफिसमध्ये जास्त यावे लागणार आहे, असेही इलॉन मस्क यांनी स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTeslaटेस्ला