शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

मसाज दरम्यान लैंगिक शोषणाचा आरोप, Elon Musk ने उडवली खिल्ली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:08 IST

Elon Musk : या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी महिलेला २ कोटी रूपयेही देण्यात आले. ट्विटरवर याबाबत एका अमेरिकन बिझनेसमनने एलन मस्कवर टिका केली.

एलन मस्क (Elon Musk) हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतो. नुकताच त्याच्यावर एका महिला कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण (Sexual misconduct allegation) केल्याचा आरोप केला. दावा करण्यात आला की, या प्रकरणाची सेटलमेंट करण्यासाठी महिलेला २ कोटी रूपयेही देण्यात आले. ट्विटरवर याबाबत एका अमेरिकन बिझनेसमनने एलन मस्कवर टिका केली. ज्यावर मस्कने खिल्ली उडवत उत्तर दिलं. 

Business Insider च्या रिपोर्टनुसार लैंगिक शोषणाचं हे प्रकरण २०१६ मधील आहे. महिला कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एलन मस्कच्या एअरोस्पेस फर्म SpaceX मध्ये फ्लाइट अटेंडेंटचं काम करत होती. मस्कवर या महिलेला प्रायव्हेट दाखवणे आणि विना परवानगी तिच्या पायांवरून हात फिरवण्याचा आरोप आहे. आरोप महिलेच्या एका मैत्रिणीने एक घोषणापत्र जारी करून लावला आहे. कारण करारानुसार पीडित महिलेने एका नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंटवर साइन केली होती.

रिपोर्टनुसार, मस्कने महिला कर्मचारीला इरॉटिक मसाज देण्याच्या बदल्यात घोडा खरेदी करून देईन अशी ऑफर दिली होती. दावा केला गेला की, या प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी २०१८ मध्ये महिला कर्मचारीला २ कोटी रूपयेही देण्यात आले होते. या बातमीनंतर अमेरिकन बिझनेसमन Chad Hurley ने मस्कवर टिका केली.

त्यांनी ट्विटरवर एलन मस्कला टॅक करत लिहिलं की, 'हॅलो Elon Musk, स्टॉप हॉर्सिंग आणि हे ट्विटर डील बंद कर. आम्हा सर्वांना एक सुखद अंत हवा आहे'. Chad Hurley च्या ट्विटला उत्तर देत मस्क म्हणाला की, 'Hi Chad, बरेच दिवस झाले भेट नाही. ठीक आहे. जर तू माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला तर तुझ्याकडेही एक हॉर्स असू शकतो'.

रिपोर्टनुसार, लैंगिक शोषणाच्या आरोपावरील एक मेलच्या उत्तरात एलन मस्कने लिहिलं की, जर तो लैंगिक शोषणासारख्या प्रकरणात असता, तर त्याच्या ३० वर्षाच्या करिअरमध्ये कुणी कधीच कसं काही बोललं नाही. मस्कने हे राजकारण असल्याचं म्हटलं. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कsexual harassmentलैंगिक छळInternationalआंतरराष्ट्रीय