शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राजा-राणीवर फेकली अंडी...हल्लेखोराला अटक, गुलामांचे रक्त शोषून ब्रिटनने प्रगती केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 07:46 IST

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला पार्कर यांच्यावर यॉर्कशायर येथे एका युवकाने (२३ वर्षे) पाच अंड्यांचा मारा केला.

लंडन :

ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला पार्कर यांच्यावर यॉर्कशायर येथे एका युवकाने (२३ वर्षे) पाच अंड्यांचा मारा केला. या देशाची प्रगती गुलामांचे रक्त शोषून झाली आहे, अशी घोषणा हा युवक देत होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. ब्रिटनच्या राजांवर झालेल्या अंड्यांच्या माऱ्याने खळबळ उडाली आहे. 

किंग चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी यॉर्कशायर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गीत सुरू असताना या दोघांवर अंड्यांचा मारा करण्यात आला. या घटनेने अजिबात विचलित न होता किंग चार्ल्स तृतीय व राणी कॅमिला यांनी लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली.

राणी एलिझाबेथ यांच्यावरही झाला होता अंड्यांचा माराराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे यंदा दि. ८ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यानंतर प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटनच्या राजेपदावर विराजमान झाले. १९८६ साली दस्तुरखुद्द राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावरही दोन महिलांनी अंड्यांचा मारा केला होता. त्या आपले पती प्रिन्स फिलिप यांच्या समवेत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले असताना ही घटना घडली होती. 

हल्लेखोर आहे डाव्या विचारसरणीचा- किंग चार्ल्स तृतीय यांच्यावर अंड्यांचा मारा करणाऱ्या युवकाचे नाव पॅट्रिक थेलवेल असे असूून, तो डाव्या विचारसरणीचा आहे. - या युवकाने पोलिसांना सांगितले की, मी गुलामगिरी, वसाहतवाद, साम्राज्यवाद या गोष्टींनी त्रस्त झालेल्या लोकांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी राजा व राणीवर अंडी फेकली. - अनेक लोकांच्या त्याग, बलिदानामुळे किंग चार्ल्स तृतीय हे राजेपदापर्यंत पोहोचले आहेत. त्याची त्यांना अजिबात जाणीव नाही.