शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:14 IST

Bangladesh Chicken Egg prices: भाव वाढले, एक डझन अंडी कितीला? वाचा सविस्तर

Bangladesh Chicken Egg prices: मांसाहारी लोकांना प्रश्न विचारला की, चिकन महाग की अंडे? तर कुणीही उत्तर देईल चिकन! पण सध्या बांगलादेशात सगळाच गोंधळ उडाला आहे. येथे अंड्यांच्या किमती गगनाला भिडत आहेत आणि चिकन मात्र एक स्वस्तात मिळून लागलंय. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सकाळपासूनच रामपुरा, मालीबाग, खिलगाव तलताला आणि शेजुनबागीचा या प्रमुख भाजीपाला बाजारांमधील परिस्थिती काहीशी वेगळीच दिसू लागलीये. एका आठवड्यात अंड्यांच्या किमतीत प्रति डझन १० रुपयांनी वाढ झाली आहे, तर ब्रॉयलर चिकनच्या किमतीत १० ते २० रुपयांनी घट झाली आहे. तसेच, भाज्यांचे दरही उच्चांक गाठत आहेत. काही मोजक्याच भाज्या खिशाला परवडणाऱ्या दरात मिळताना दिसत आहेत.

अंड्यांचा भाव वाढला...

एकेकाळी प्रोटीन्ससाठी सर्वात स्वस्त पर्याय मानली जाणारी अंडी आता सामान्य खरेदीदारांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसून येते आहे. सध्या, मोठ्या बाजारपेठांमध्ये अंडी प्रति डझन १४० रुपये आणि रिटेल बाजारात १४५ रुपये प्रति डझन दराने विकली जात आहेत. एका आठवड्यापूर्वी ही किंमत १३०-१३५ रुपये होती. माळीबाग मार्केटमधील अंडी विक्रेते अबुल हुसेन म्हणाले की, शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासून नुकसान सहन करावे लागत होते. यावेळी जर किमती थोड्या वाढल्या असतील, तर त्यांच्यासाठी ते आवश्यक होते. अनेक शेतीचे पर्याय बंद आहेत. साधारणपणे पावसाळ्यात अंड्यांच्या किमती वाढतात, परंतु यावेळी आतापासूनच किमती वाढल्या आहेत.

चिकन बनतंय 'स्वस्त प्रोटीन्स'

अंडी महाग झाली असली तरी, चिकनच्या किमतीत घट झाली आहे. ब्रॉयलर चिकन आता १६० ते १८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे, जे गेल्या आठवड्यापेक्षा १०-२० रुपये कमी आहे. याचा अर्थ असा की आता बांगलादेशातील जेवणाच्या प्लेटमध्ये चिकन असणे स्वस्त होऊ शकते. भाजीपाला बाजाराची अवस्था अजूनही वाईट आहे. पडवळ आणि दुधीसारख्या काही उन्हाळी भाज्या ४०-६० रुपये प्रति किलो दराने विकल्या जात आहेत, तर चिचिंगा, कोळंबी, करोंडा, उस्ता, वांगी आणि बरबती ५०-६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहेत. लोक म्हणतात की उन्हाळी भाज्यांचा पुरवठा वाढला आहे, त्यामुळे किमती थोड्या कमी झाल्या आहेत. पण जर अवकाळी पाऊस पडला तर किमती वाढतात.

टॅग्स :Bangladeshबांगलादेशvegetableभाज्या