शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

उद्ध्वस्त...! तुर्की, सीरिया भूकंपातील मृत्यूंचा आकडा ४ हजारावर, ५६०० इमारती कोसळल्या; भारतानं पाठवली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 08:39 IST

तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे.

तुर्कीत १०० वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या भूकंपानं सारंकाही उद्ध्वस्त झालं आहे. ज्यानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. काल पहाटे जेव्हा संपूर्ण देश साखरझोपेत होता. तेव्हा तुर्की आणि सीरिया हादरली. उंचच उंच इमारती पत्त्यासारख्या एका क्षणात कोसळल्या. वर्दळीच्या शहरांचं रुपांतर आज खंडरमध्ये झालंय. दोन्ही देशांमधील मृत्यूंचा आकडा आता वाढतच चालला आहे. आतापर्यंत ४ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यात तुर्कीतील २८०० तर सीरियामध्ये १२०० हून अधिक जणांचा समावेश आहे. 

तुर्की आणि सीरियातील या कठीण प्रसंगी अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. भारतानं मदतीचा हात पुढे करत मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. मदत आणि बचावासाठी गाझियाबादच्या हिंडन विमानतळावरुन एनडीआरएफच्या टीम तुर्कीसाठी रवाना झाल्या आहेत. 

तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी भूकंपामुळे झालेल्या विनाशाचे वर्णन शतकातील सर्वात मोठी आपत्ती असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दरम्यान ध्वज अर्ध्यावर आला आहे. आपत्तीच्या या कठीण काळात तुर्कस्तानला आपल्या जुन्या शत्रू देशांचाही पाठिंबा मिळत आहे. वर्षानुवर्षे सीमा विवाद असूनही ग्रीसने तुर्कस्तानला मदतीचे आश्वासन दिले आहे. याशिवाय नाटो, इस्लामिक सहकार्य संघटनेनेही तुर्कस्तानप्रती सहानुभूती व्यक्त करताना मदत देऊ केली आहे.

तुर्कीतील भूकंपामुळे उंच इमारती एका क्षणात कोसळल्या. भूकंपानंतर अवघ्या ५ सेकंदात सॅनलुर्फा शहराची बहुमजली इमारत पूर्णपणे कोसळली. बहुमजली इमारतीचा ढिगारा ट्रान्सफॉर्मरवर पडला, त्यामुळे विजेचे खांब जमिनीवर कोसळले आणि जिवंत तारा रस्त्यावर विखुरल्या. तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे सर्वात जास्त विध्वंस दियारबाकीर शहरात झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंप इतका जोरदार होता की भक्कम इमारतीही वाळूच्या ढिगाऱ्यांसारख्या विखुरल्या आहेत.

दशकातील सर्वात भीषण भूकंपगेल्या काही दशकांतील भूकंपांपैकी हा भूकंप सर्वात भीषण आहे. ३ हजाराहून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. तुर्कीच्या अधिकृत आकडेवारीनुसार, आतापर्यंत २८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. अजूनही हजारो लोक ढिगाऱ्याखाली अडकले असले तरी त्यांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. 

टॅग्स :Earthquakeभूकंप