शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

तैवानमध्ये हाहाकार; गेल्या चोवीस तासांत भूकंपाचे 100 झटके, जापानला त्सुनामीचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 15:42 IST

तैवानच्या यूजिंग भागात आलेल्या भूकंपामुळे रस्त्यांना मोठे तडे गेले असून, ट्रेनही रुळावरच पलटी झाल्या आहेत.

Earthquake in Taiwan: चीनसोबत दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षात तैवानसाठी काल(शनिवार)नंतर आजचा(रविवार) दिवसही अतिशय वाईट ठरला. काल आणि आज तैवानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. आज(रविवार) 7.2 रिश्टर स्केल तर शनिवारी 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला. पूर्व तैवानच्या युजिंग भागात हे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे हुआलिन परिसरातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. यादरम्यान, जापानला त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानमिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत देशात लहान-मोठे 100 हून अधिक भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी दुपारी झालेल्या या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, रस्त्यांना मोठे तडे गेले, ट्रेन रुळावरच पलटी झाली. भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली असून, जीव वाचवण्यासाठी अनेकजण अजूनही आपल्या घराबाहेर आले आहेत. 

रेल्वे सेवा तात्पुरती बंदइतकी मोठी घटना घडली, तरीदेखील सुदैवाने यात अद्याप जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक माध्यमांनी ही माहिती दिली. तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू तैतुंग परिसरात होता. सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान या भूकंपामुळे झाले आहे. रस्त्यांना तडे गेले आहेत, एक मोठा पुलही कोसळला आहे. तैवान रेल्वे प्रशासनाने सांगितले की, हुआलियन आणि तैतुंगला जोडणारी रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. 

तैवानमध्ये अनेकदा भूकंप

ताैवान रिंग ऑफ फायर भागात आहे. ही अशी जागा असते, जिथे सर्वाधिक भूकंप किंवा त्सुनामी, ज्वालामुखी विस्फोट होऊ शकतात. तैयवान दोन टेक्टोनिक प्लेटांच्या अगदी जवळ वसलेला देश आहे. या प्लेट्समध्ये थोडीही हालचाल झाली की, तैवानमध्ये भूकंप किंवा त्सुनामीचा धोका निर्माण होतो. यापूर्वी 2016 मध्ये आलेल्या भूकंपात 100 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, 1999 मध्ये आलेल्या  7.3 तीव्रतेच्या भूकंपात 2000 लोक मृत्यूमुखी पडले होते.

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीयBuilding Collapseइमारत दुर्घटना