भारताचा शेजारी देश नेपाळ पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. रविवारी (३० नोव्हेंबर २०२५) नेपाळच्या सुदूर पश्चिम प्रांतातील बझांग जिल्ह्यात भूकंपाची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे लोकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राष्ट्रीय भूकंप देखरेख आणि संशोधन केंद्र (NEMRC) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली. स्थानिक वेळेनुसार, भूकंपाचा हा धक्का दुपारी १२ वाजून ०९ मिनिटांनी जाणवला. बझांग जिल्ह्यातील माउंट सैपाल हे भूकंपाचे केंद्रस्थान होते.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बझांग जिल्ह्यासह पश्चिम प्रांतातील बाजुरा आणि शेजारच्या जिल्ह्यांतील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा धक्का जाणवताच मोठ्या संख्येने लोक भीतीने आपापल्या घराबाहेर धावले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये भूकंपाचे दोन धक्के बसले होते, ज्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
Web Summary : Nepal's Bajhang district experienced a 4.4 magnitude earthquake on November 30, 2025, triggering panic. Tremors were felt in nearby districts. This recent event follows earlier earthquakes, heightening citizen anxiety in the region.
Web Summary : 30 नवंबर, 2025 को नेपाल के बाझांग जिले में 4.4 तीव्रता का भूकंप आया, जिससे दहशत फैल गई। आसपास के जिलों में झटके महसूस किए गए। हाल ही में पहले आए भूकंपों के बाद नागरिकों की चिंता बढ़ गई है।