शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

एक दोन नाही, तर दररोज 1000 भूकंपाचे धक्के...'या' देशातील नागरिकांनी केले पलायन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 15:04 IST

तज्ञांच्या माहितीनुसार, 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारीदरम्यान 18,400 पेक्षाही जास्त भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake : भूकंपामुळे जमीन दुभंगणे, इमारती पडणे, भूस्खलन, पूर अशाप्रकारच्या घटना घडतात. जगभरात अनेक ठिकाणी सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवतात. साधारणपणे भूकंपाचा एखादा जरी धक्का जाणवला तर लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरते. पण, जगात असा एक असे ठिकाण आहे, जिथे दररोज सरासरी 1000 भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. हे ठिकाण ग्रीस देशातील अमोरगोस आहे.

न्यूज एजन्सी एएफपीने अथेन्स विद्यापीठाच्या सिस्मॉलॉजी प्रयोगशाळेचा हवाला देत सांगितले की, 26 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान सायक्लेड द्वीपसमूहाच्या बेटांवर 18,400 हून अधिक भूकंपांची नोंद झाली आहे. भूकंपामुळे अमोरगोसमध्ये इमरजन्सीची परिस्थिती कायम आहे.

5.3 रिश्टर स्केलचा भूकंपग्रीसमधील सँटोरिन बेटावर दररोज भूकंपाचे धक्के बसत आहेत, मात्र 10 फेब्रुवारीला सर्वात शक्तिशाली भूकंप जाणवला. या दिवशी येथे 5.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला. येथे रिश्टर स्केलवर फक्त 4 किंवा जवळपासचे भूकंप जाणवत आहेत. मात्र, दररोज भूकंपाचे धक्के बसत असल्याने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, अमोरगोस 6 दबाव क्षेत्रांनी वेढलेला आहे, ज्यामुळे या भागात सर्वाधिक भूकंप येत आहेत. 

1956 मध्ये झालेला मोठा भूकंप1956 मध्ये या भागात शक्तिशाली भूकंप झाला होता. यंदाच्या भूकंपाची तीव्रता 7.5 आणि 7.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण आहे. भूकंपामुळे येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तर अनेकांनी घरे सोडून इतर शहरांमध्ये स्थलांतर केले आहे. अमोरगोस पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी सुमारे 1 लाख पर्यटक येतात. भूकंपामुळे यावेळी येथील पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपInternationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटके