न्यूयॉर्क : कोण? कसं? मृत्यूच्या दाढेतून परत येईल सांगता येत नाही. असाच प्रकार नुकताच जन्माला आलेल्या जॉर्जिया बॉवेन हिच्या बाबतीत घडला आहे. ज्यावेळी जॉर्जिया बॉवेनचा सिझेरियन पद्धतीने जन्म झाला. त्यावेळी तिने एकदा श्वास घेतला, हात वर केला, दोनवेळा मोठ्याने रडली आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. खरंतर, जॉर्जिया बॉवेनला आईच्या गर्भाशयातच असतानाच तिला हृदयविकाराचा झटका आला होता. तिच्या हृदयाला गंभीर अशी इजा झाली होती. तसेच, तिच्या स्नायूंचा मोठा भाग निकामी झाला होता. डॉक्टरांनी तिला अतिदक्षता विभागात ठेवले होते, त्यावेळी तिचे फुफुस आणि हृदय काम करत होते. यावेळी डॉक्टरांनी तिला येथील बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तिच्यावर 'एक्सपेरीमेंटल प्रोसिजर' करण्याचा प्रयत्न सुरु केला, जो हृदयविकाराचा झटका आल्यानतंर कोणवरही करण्यात आला नव्हता. अशा, यशस्वी शस्त्रक्रियेनंतर जॉर्जिया बॉवेन हृदयाच्या गंभीर आजारातून बाहेर आली आणि तिला 'एक्सपेरीमेंटल प्रोसिजर' च्या माध्यमातून पुनर्जन्म मिळाला. 'एक्सपेरीमेंटल प्रोसिजर'मध्ये रुग्णाच्या शरीरातील चांगल्या भागातून मितोकोंड्रीया काढून ते इजा झालेल्या भागात सोडले जाते. मितोकोंड्रीया हे द्रव्य पेशींचे पोषण करण्याचे काम करत असतात. अशा प्रकारचे उपचार सर्वातप्रथम 2015 साली झाले होते. आजवर केवळ 12 बाळांवर अशाप्रकारे उपचार करण्यात केले होते.
डॉक्टरांची कमाल... मृत्यूच्या दाढेतून चिमुकली आली बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 19:18 IST