शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

अपुऱ्या स्तनपानामुळे भारताला होईल 90 हजार कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 18:45 IST

वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारतात आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

संयुक्त राष्ट्रे, दि. 2 - वेगवेगळ्या कारणांमुळे तान्ह्या मुलांना स्तनपान करण्याचे प्रमाण गेल्या काही काळात कमालीचे घटले आहे. भारतातही आपल्या मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांची संख्या घटली आहे. मात्र  मुलांना होणारे अपुऱे स्तनपान भारतासाठी जबर आर्थिक नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. देशात दरवर्षी सुमारे एक लाख मुलांचा विविध आजारांची शिकार होऊन मृत्यू होत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान करण्यात आले तर त्यांच्या मृत्यू टाळता येऊ शकेल. अपुऱ्या स्तनपानामुळे होत असलेल्या आकस्मिक मृत्युमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 14 अब्ज डॉलरचे (सुमारे 89.446 हजार कोटी रुपयांचे) नुकसान होऊ शकते, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.   ग्लोबल ब्रेस्टफिडिंग कलेटिव्हच्या सहकार्याने युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेने ग्लोबल ब्रेस्टफिडिंग स्कोअरकार्डच्या नवा अहवाल तयार केला आहे. स्तनपानामुळे बालमृत्यूची दोन मोठी कारणे असलेल्या अतिसार आणि न्यूमोनिया यांना अटकाव करण्यासाठी मदत मिळते. तसेच महिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या ओवरी आणि स्तनाच्या कर्करोगापासून महिलांचे संरक्षण होऊ शकते, असे या अहवालात म्हटले आहे.  केवळ चीन, भारत, नायजेरिया, मॅक्सिको आणि इंडोनेशिया या देशांमध्ये अपुऱ्या स्तनपानामुळे दरवर्षी 2 लाख 36 हजार मुलांचा मृत्यू होतो. या मृत्युंमुळे या देशांना येत्या काळात दरवर्षी 119 अब्ज डॉलर सुमारे 7.59 लाख कोटी रुपये एवढे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सहा महिन्यांपेक्षा लहान मुलांना स्तनपानाचे प्रमाण 55 टक्क्यांहून अधिक असूनही भारतात बालमृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे प्रमाण अधिक आहे, असे हा अहवाल सांगतो. अतिसार आणि न्युमोनियामुळे भारतात दरवर्षी सुमारे 99 हजार 499 मुलांचा मृत्यू होत असतो. या मुलांना योग्य प्रमाणात स्तनपान केल्यास त्यांचे मृत्यू टाळता येतील.  कमी स्तनपानामुळे तान्ह्या मुलांसोबतच कर्करोग आणि टाइप-2 प्रकारच्या डायबिटीसशी झुंजत असलेल्या महिलांच्या मृत्युमुळेही देशाच्या अर्थव्यवस्थेला 7 अब्ज डॉलर एवढे नुकसान होण्याचा अंदाज आहे. तसेच या नुकसानामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.70 टक्के घट होण्याची शक्यता आहे.