शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता दुबईत कोणताही नागरिक उपाशी झोपणार नाही; व्हेंडिंग मशीनमधून मिळणार मोफत ब्रेड! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 17:30 IST

Dubai : दुबईमध्ये जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली असेल तर त्याच्यासाठी व्हेंडिंग मशीन्स (Vending Machines)  बसवण्यात आल्या आहे. 

दुबई : संयुक्त अरब अमिराती (UAE) ची राजधानी दुबई  (Dubai) येथे एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कोणताही गरजू रहिवासी उपाशी झोपू नये, यासाठी येथे उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. दुबईमध्ये जर एखाद्या व्यक्तीला भूक लागली असेल तर त्याच्यासाठी व्हेंडिंग मशीन्स (Vending Machines)  बसवण्यात आल्या आहे. 

या मशीन्समधून व्यक्ती मोफत ब्रेड घेऊ शकतात. या मशीन्समध्ये एका मिनिटात गरम आणि ताजा ब्रेड मिळतो. 'ब्रेड फॉर ऑल' ही मोहीम गेल्या आठवड्यात शनिवारी 17 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये सुरू करण्यात आली. दुबईमध्ये मोफत ब्रेड देण्यासाठी ठिकठिकाणी अनेक व्हेंडिंग मशीन्स बसवण्यात आल्या आहेत. वेंडिंग मशीनद्वारे मजूर, डिलिव्हरी रायडर्स आणि रोजंदारी मजुरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मशीन्स आधुनिक असून गरजूंसाठी ताबडतोब ब्रेड तयार करून त्यांना मोफत पुरवतात. 

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 'ब्रेड फॉर ऑल' मोहीम मोहम्मद बिन रशीद ग्लोबल सेंटर फॉर एंडॉवमेंट कन्सल्टन्सीद्वारे अवकाफ अँड मायनर्स अफेयर्स फाऊंडेशन (AMAF) अंतर्गत सुरू करण्यात आली आहे. कारण, वंचित कुटुंबांना आणि मजुरांना दिवसाच्या वेगवेगळ्यावेळी मोफत ब्रेडची सोय करता येऊ शकेल. अनेक व्हेंडिंग मशीन्स (Vending Machines)  किराणा दुकानाच्या प्रवेशद्वारावर ठेवल्या आहेत. 

या मशीन्समध्ये सातत्यपूर्ण पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी दिवसातून दोनदा रिफिल केले जाते, ज्यामुळे लोकांना अरबी ब्रेड आणि फिंगर रोल यापैकी एक निवडण्याचा पर्याय मिळतो. एकदा  'क्लिक टू ऑर्डर' निवडल्यानंतर, मशीन ब्रेड तयार करण्यास सुरवात करते आणि एका मिनिटात मोफत गरम ब्रेड (Free Bread) वितरित करते.

टॅग्स :Dubaiदुबई