शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

दुबईचा बुर्ज खलिफा झाला 'राममय', अमेरिकेसह संपूर्ण जगात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 10:20 IST

सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते.

अयोध्येत काल (२२ जानेवारी) रामलला विराजमान झाले आहेत. यानंतर आज पहिल्याच दिवशी पहाटे राम मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. अगदी चेंगराचेंगरी सारखी स्थिती आहे. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरात तसेच परदेशातही उत्साहाचे वातावरण होते. याच पार्श्वभूमीवर दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीवर प्रभू रामाचे पोस्टर झळकवण्यात आले.

याचबरोबर, सोमवारी प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील टाईम्स स्क्वेअरवर श्रीरामाचे फोटो आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे थ्रीडी पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. तसेच रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी रविवारी न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ राम मंदिर’च्या सदस्यांनी लाडू वाटून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

न्यू यॉर्क टाईम्स स्क्वेअर, वॉशिंग्टन, डीसी, एलए, सॅन फ्रान्सिस्को, इलिनॉय, न्यू जर्सी, जॉर्जिया आणि बोस्टनसह संपूर्ण अमेरिकेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उत्सव साजरा करण्यात आला. याशिवाय अमेरिकेतील विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्यानिमित्त गोल्डन गेट ब्रिजवर कार रॅली काढली. दुसरीकडे, अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मेक्सिकोमध्ये एका राम मंदिराचे उद्धाटन करण्यात आले. मेक्सिकोमध्ये बांधलेल्या या राम मंदिराचे उद्घाटन अमेरिकेतून आलेल्या एका पुजाऱ्याने केले होते.

राम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दीप्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्याधाममध्ये लोकांची गर्दी होऊ लागली आहे. मंगळवारी सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काल रात्री उशिरापासूनच राम मंदिराच्या मुख्य गेटबाहेर भाविकांची मोठी रांग लागली होती. पहाटे 2 वाजल्यापासून येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. गर्दीत उपस्थित लोक गेटसमोर ‘जय श्री राम’चा जयघोष करत मंदिरात प्रवेश करत आहेत. देशभरातून भाविक अयोध्येत श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत. यासोबतच अयोध्येतील स्थानिक रहिवासीही राम मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी पोहोचत आहेत. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याDubaiदुबईAmericaअमेरिका