शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

आता रात्रीअपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षतेसाठी ड्रोन मदतीला येणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 19:28 IST

जेव्हा रात्री महिला एकट्या रस्त्यावरून चालत असतील तेव्हा थर्मल कॅमेरायुक्त ड्रोन त्यांची सुरक्षा करतील (Drones to protect women). जर कुणी त्यांच्यासोबत छेडछाड केली, त्यांना त्रास द्यायला आलं तर हा ड्रोन त्यांच्या मदतीला येणार आहे.

कामानिमित्त महिलांना रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहावं लागतं. काही महिला रात्री उशिरा काम संपवून घरी परतत असतात तर काही नाइट शिफ्टसाठी म्हणून रात्री घराबाहेर पडतात. अशावेळी उपस्थित होतो तो महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न (Woman safety tips). महिलांच्या सुरक्षेसाठी एमर्जन्सी हेल्पलाइन नंबर आहेतच. पण आता महिलांच्या सुरक्षेसाठी ड्रोनही उपलब्ध होणार आहेत.

ब्रिटनमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आता नव्या तंत्रज्ञानाची मदत घेण्याची योजना आखण्यात आली आहे (Drone for woman safety). जेव्हा रात्री महिला एकट्या रस्त्यावरून चालत असतील तेव्हा थर्मल कॅमेरायुक्त ड्रोन त्यांची सुरक्षा करतील (Drones to protect women). जर कुणी त्यांच्यासोबत छेडछाड केली, त्यांना त्रास द्यायला आलं तर हा ड्रोन त्यांच्या मदतीला येणार आहे. (Woman safety drone)

महिला मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून फ्लाइंड एस्कॉर्टला आपल्या मदतीसाठी बोलावू शकतात. अवघ्या चार मिनिटांत ड्रोन एक शक्तिशाली स्पॉटलाइट आणि थर्मल कॅमेरासोबत संबंधित व्यक्तीचा पाठलाग करेल आणि त्याला घाबरवून पळवून लावेल. हे ड्रोन खूप शक्तिशाली असतील. या एका ड्रोनची किंमत तब्बल ३५ लाख रुपये असेल.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार ड्रोन डिफेन्सद्वारा हा ड्रोन विकसित करण्यात आला आहे. माजी पोलीस अधिकारी, नागरिक उड्डाण प्राधिकरणाच्या तज्ज्ञांच्या टीमने हा तयार केला आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एआय संचालित या ड्रोनची टेस्टिंग केली जाईल. नॉटिंघम युनिव्हर्सिटीमध्ये याची चाचणी केली जाणार असल्याची माहिती ड्रोन डिफेन्सचे संस्थापक रिचर्ड गिल यांनी दिली.

हा ड्रोन तयार करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, भविष्यात हा ड्रोन पोलीस हेलिकॉप्टर्सची जागा घेऊ शकतो. पोलीस हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत हा ड्रोन नागरिकांच्या सुरक्षेसाठी एक स्वस्त, शांत आणि कमी प्रदूषित असा पर्याय आहे, हे दाखवणं हेच या चाचणी उद्दिष्ट असेल. रिचर्ड गिल म्हणाले, "हेलिकॉप्टरमार्फत पोलीस सुरक्षा देण्यासाठी प्रति तास तीन लाख रुपये खर्च येतो. यामध्ये पाच चालक दलाचे सदस्य असतात. पण या ड्रोनचा खर्च ताशी फक्त १० हजार रुपये असेल. २०० फूट उंचीवर हा ड्रोन उडेल आणि याचा एआय फोन सिग्रनला ट्रॅक करेल. गरज पडल्यास कंट्रोल सिस्टममधील पायलट याला नियंत्रित करू शकेल"

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीEnglandइंग्लंड