शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सीरियातील लष्करी अकादमीवर ड्रोन हल्ला, १०० हून अधिक जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:56 IST

Drone attack : सीरियातील लष्करी अकादमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील लष्करी तळांवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यामधील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे.

सीरियातील लष्करी अकादमीवर झालेल्या ड्रोन हल्ल्यात किमान १०० जणांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील लष्करी तळांवर झालेल्या आतापर्यंतच्या हल्ल्यामधील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, सीरियाचे संरक्षण मंत्री लष्करी अकादमीमध्ये एका पदवीदान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. ते तिथून निघून गेल्यानंतर काही वेळातच घटनास्थळावर ड्रोनच्या माध्यमातून बॉम्बफेक करण्यात आली. सीरियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, होम्स प्रांतामध्ये लष्करी अकादमीवर झालेल्या हल्ल्यात नागरिकांसह सैनिकांचाही मृत्यू झाला. 

दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, या हल्ल्याची जबाबदारी अद्यापतरी कुठल्याही संघटनेने घेतलेली नाही. सीरियाच्या संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याला पूर्ण शक्तीनिशी प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.  सीरियाच्या सैन्यदलांनी इदबिल परिसरामध्ये मोठ्या प्रमामावर बॉम्बफेक केली.  अकादमीमध्ये सजावटीचं काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, समारंभ आटोपल्यानंतर लोक मोकळ्या जागेत गेले. तेव्हाच हा हल्ला करण्यात आला. हे ड्रोन कुठून आले ते आम्हाल कळले नाही. मात्र हल्ला झाल्यानंतर जमिनीवर मृतदेह पडले होते.

रॉयटर्सने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानुसार एका मोठ्या जागेवर लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. स्फोटामुळे काही मृतदेह जळत होते. तर काही मृतदेहांना आगीने घेरले होते. चहुबाजूला आरडाओरडा सुरू होता. सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्से सांगितले की, या हल्ल्यामध्ये १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२५ जण जखमी झाले आहेत.  

टॅग्स :Blastस्फोटInternationalआंतरराष्ट्रीय