शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:13 IST

BRICS मध्ये सामील होण्याच्या पाकिस्तानच्या आशा धुळीला मिळाल्या आहेत.

BRICS 2024 : रशियात आयोजित ब्रिक्स शिखर परिषद संपल्यामुळे यंदाही पाकिस्तानचे या संघटनेत सामील होण्याचे स्वप्न भंगले आहे. चीन आणि रशियाचा पाठिंबा असूनही पाकिस्तानला ब्रिक्स गटात प्रवेश मिळाला नाही. ब्रिक्स संघटनेच्या नव्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळालेले नाही. दुसरीकडे, तुर्कस्तानचा या भागीदार देशांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने गेल्या वर्षी ब्रिक्स सदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केला होता.

चीनचे पाकिस्तानला आश्वासन ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याचे आश्वासन चीनने दिले होते, पण ब्रिक्सच्या भागीदार देशांच्या यादीतही पाकिस्तानला स्थान मिळाले नाही. ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्याला चीन आणि रशियाने पाठिंबा दिला होता. पण, पाकिस्तानच्या ब्रिक्समधील प्रवेशावर भारत फारसा समाधानी नव्हता, त्यामुळे यंदा पाकिस्तानचा यात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, भारत या गटाचा संस्थापक सदस्य आहे. सुरुवातीला या गटात ब्राझील (बी), रशिया (आर), भारत (आय), चीन (सी) आणि नंतर दक्षिण आफ्रिकेला सामील करण्यात आले होते. 

पीएम मोदींचा रशिया-चीनला पाकिस्तानबाबत संदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ब्रिक्समधील आपल्या संबोधनात म्हटले की, भारत ब्रिक्समध्ये आणखी 'भागीदार देशांचे' स्वागत करण्यास तयार आहे, परंतु यासंदर्भातील निर्णय सर्वानुमते घेतले पाहिजेत. 16 व्या ब्रिक्स परिषदेत, पंतप्रधान मोदींनी 9 सदस्यीय गटात पाकिस्तानच्या प्रवेशासाठी रशिया आणि चीनच्या समर्थनासंदर्भात इशाऱ्यांमध्ये आपला थेट संदेश दिला. ब्रिक्सच्या संस्थापक सदस्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

ब्रिक्सच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ब्रिक्स सदस्यांना दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या शक्तींचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आणि या मुद्द्यावर दुटप्पीपणाला जागा नसल्याचे म्हटले. दरम्यान, ब्रिक्स नवीन सदस्यांना केवळ सहमतीने प्रवेश देते, म्हणून हे स्पष्ट होते की, पाकिस्तानच्या सदस्यत्वाला भारताच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. रशिया आणि चीनच्या मदतीने पाकिस्तान ब्रिक्समध्ये प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल, अशी आशा बहुतांश पाकिस्तानी नेत्यांना होती, पण तसे होऊ शकले नाही. अपेक्षेप्रमाणे भारताने पाकिस्तानचा या गटात समावेश करण्यास सहमती दर्शवली नाही. 

पाकिस्तानने गेल्यावर्षी अर्ज केला होतापाकिस्तानने गेल्या वर्षी ब्रिक्स सदस्यत्वासाठी औपचारिक अर्ज केला होता. BRICS मध्ये सामील होऊन पाकिस्तानला जगातील प्रभावशाली अर्थव्यवस्थांसोबत आपली युती मजबूत करायची आहे. BRICS मध्ये सामील होऊन पाकिस्तानला आर्थिक आणि राजनैतिकदृष्ट्या खूप फायदा होईल. पण हे भारतासाठी कोणत्याही प्रकारे फायदेशीर नाही, कारण दोन देशांमधील द्विपक्षीय संबंध किमान गेल्या पाच वर्षांपासून सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत. पाकिस्तानविरोधात दहशतवादाच्या मुद्द्यावर लढा देणाऱ्या भारताला या आघाडीवर त्याच्याशी कोणतेही संबंध नको आहेत आणि ब्रिक्स परिषदेतील भारताच्या भूमिकेने हे स्पष्ट केले आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतrussiaरशियाchinaचीन