शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

Pakistan: पाकिस्तानात निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच 'हिंदू' महिला; कोण आहे सवेरा प्रकाश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 16:04 IST

पाकिस्तानमध्ये नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

Pakistan Election 2023 | नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. आगामी निवडणुकीसाठी मागील काही दिवस सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. आता निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असल्याने जवळपास सर्वच उमेदवारांची यादी समोर आली आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सवेरा प्रकाश या महिलेचाही समावेश आहे. विशेष बाब म्हणजे पाकिस्तानात निवडणूक लढणारी ती पहिली हिंदूमहिला ठरली आहे. प्रथमच हिंदूमहिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सवेरा प्रसिद्धीच्या झोतात आली. 

दरम्यान, पाकिस्तानात निवडणूक लढणारी सवेरा प्रकाश ही पहिली महिला असून, ती खैबर पख्तूनख्वाच्या बुनेर मतदारसंघातून मैदानात आहे. पाकिस्तानमधील राजकीय पक्ष पीपल्स पार्टीच्या तिकिटावर ती नशीब आजमावत आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, सवेराचे वडील ओम प्रकाश हे पेशाने डॉक्टर आहेत आणि नुकतेच ते निवृत्त झाले. ओम प्रकाश मागील ३५ वर्षांपासून पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) सदस्य देखील आहेत. 

५५ वर्षांत प्रथमच महिला उमेदवार सवेरा स्वतः एक डॉक्टर आहे आणि तिने २०२२ मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. याशिवाय ती बुनेरमधील पीपल्स पार्टीच्या महिला विंगची सरचिटणीसही राहिली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याचे ती सांगते. महिलांची समाजातील स्थिती सुधारण्यासाठी माझा लढा सुरू आहे, जर निवडणुकीत यश मिळाले तर गरीब आणि वंचितांसाठी काम करीन, असे आश्वासन तिने मतदारांना दिले. ५५ वर्षांत प्रथमच एक महिला उमेदवार बुनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, जिथून सवेराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकHinduहिंदूWomenमहिला