शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

Israel stampede: इस्त्रायलमध्ये मोठी दुर्घटना; बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरीत 44 ठार झाल्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 08:51 IST

first Big Festival in Israel after corona vaccination and no mask order: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले असून लोकांच्या सलामतीसाठी प्रार्थना करतो असे म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार माउंट मेरनमध्ये स्टेडिअमच्या खुर्च्या मोडल्या. यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. न्यूज चॅनल १२ नुसार यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर करून मास्क न लावण्याची सूचना देणाऱ्या इस्रायलमध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे. इस्त्रायलमध्ये मोठ्या काळानंतर बोनफायर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यामध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत प्राथमिक माहितीनुसार १२ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. (stampede at a Jewish pilgrimage site in northern Israel killed at least 44 people on Friday, the Magen David Adom rescue service and a hospital source told AFP.)

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले असून लोकांच्या सलामतीसाठी प्रार्थना करतो असे म्हटले आहे. मीडिया रिपोर्टनुसार माउंट मेरनमध्ये स्टेडिअमच्या खुर्च्या मोडल्या. यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. न्यूज चॅनल १२ नुसार यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. मॅगेन डेव्हीड अॅडम रेस्क्यू सर्व्हिसने देखील ३८ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तसेच आणखी काही लोक हॉस्पिटलमध्ये मृत झाल्याचे म्हटले आहे. झीव्ह हॉस्पिटलने आपल्याकडे सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यामुळे एकूण मृतांचा आकडा हा ४४ वर गेला आहे. 

ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा यहुदींसाठी जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. हे एक वार्षिक तीर्थस्थळ आहे. हजारो लोक यहूदी वार्षिक स्मरणोत्सवासाठी दुसऱ्या शतकाचे संत संत रब्बी शिमोन बार योचाई यांच्या समाधीस्थळावर आले होते. रात्रभर प्रार्थना आणि डान्स केला जात होता. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले घटनेचे व्हिडीओ भयानक आहेत. या व्हिडिओंमध्ये तिथे उपस्थित प्रत्येकजन वाचण्यासाठी एकमेकांवर चढण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी जखमींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

इस्त्रायलच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख मेगन डेविड अॅडम यांनी सांगितले की, ४४ लोकांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले आहेत. पोलिसांनुसार पायऱ्यांवरून काही जण घसरले यामुळे तिथे धावपळ उडाली. इस्त्रायलने कोरोना निर्बंध हटविल्यानंतर तिथे हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. माउंट मैरनमध्ये गेल्यावर्षी बोनफायर कार्यक्रम रद्द केला होता. 

इस्त्रायल बनला पहिला देशचीनमधून पसरलेला कोरोना व्हायरस आज जगभरात थैमान घालत आहे. कोरोना व्हायरस 2019च्या अखेरीस चीनमधील वुहान शहरातून पसरला. कोरनाचे स्क्रमण एवढ्या वेगाने परसले, की त्यांने अल्पावधीतच कोट्यवधी लोकांना आपल्या विळख्यात घेतले, तर लाखो लोकांना यामुळे जीव गमवावा लागला. इस्रायलने मास्क न लावण्याचे आदेश दिले आहेत. असा आदेश देणारा इस्रायल हा जगातील पहिलाच देश ठरला आहे. इस्रायलमध्ये 81 टक्के लोकांना कोरोना लस टोचण्यात आली आहे. यानंतर येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर येथील लोकांनी चेहऱ्यावरील मास्क काढले असून सोशल मीडियावरही आनंद व्यक्त केला आहे.

टॅग्स :Israelइस्रायलcorona virusकोरोना वायरस बातम्या