शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

आगीसोबत खेळू नका, अन्यथा तिसरं महायुद्ध भडकेल...! रशियाची अमेरिकेला धमकी, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 18:10 IST

"जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियात हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली, तर संकटांचा डोंगर कोसळू शकतो आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडेही जाऊ शकते"

रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे नाव नाही. संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. यातच आता रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला रशियात हल्ले करण्यासाठी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी दिली, तर संकटांचा डोंगर कोसळू शकतो आणि जग तिसऱ्या महायुद्धाकडेही जाऊ शकते

मॉस्कोमध्ये पत्रकारांसोबत बोलताना लावरोव्ह म्हणाले, जर पाश्चात्य देशांनी युक्रेनला पुरवलेल्या क्षेपणास्त्रांचा रशियावर हल्ला करण्यासाठी परवानगी दिली, तर ते आगीशी खेळल्यासारखे होईल. याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागू शकतात.

याच बरोबर, लावरोव्ह यांनी अमेरिकेसह सर्व पाश्चिमात्य देशांना युक्रेनची विनंती नाकारण्यास सांगितले आहे, ज्यात युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिका आणि इंग्लंडकडे, पाश्चिमात्य देशांनी पुरवलेल्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा रशियाविरोधात वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे. मात्र, युक्रेनने वारंवार विनंती करूनही अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम आहे की, लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर केवळ युक्रेनच्या भूमीवरच करावा. रशियाच्या भौगोलिक सीमेत करू नये.

पाश्चात्य देशांनी युक्रेनची विनंती मान्य केल्यास युक्रेन-रशिया युद्ध वेगळ्या वळणावर जाईल, असा इशारा लावरोव्ह यांनी पाश्चिमात्य देशांना दिला आहे. ते म्हणाले, “आम्ही केवळ स्टॉर्म शॅडोच नाही तर, लांब पल्ल्यांचे मिसाइल वापरण्यासंदर्भात अमेरिकेकडून परवानगी देण्यासंदर्भात ऐकत आहोत. वाशिंग्टनमधील काही अज्ञात सूत्रांनी म्हटले आहे की, युक्रेनच्या विनंतीकडे सकारात्मक दृष्टीने बघितले जात आहे. अमेरिकेकडून ही ब्लॅकमेलिंग आहे.  पाश्चिमात्य देश परिस्थिती आणखी बिघडण्यापासून वाचवू इच्छित आहे, असे जगाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र वास्तवात, हा एक धोका आहे. खरे तर, पाश्चिमात्य देश परिस्थिती आणखी खराब होण्यापासून वाचवत नाहीयेत, तर बिघडवण्यासाठी युक्रेनला चिथावणी देत आहेत."

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाAmericaअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिन