अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी एक प्रेसिडेंशियल AI चॅलेंज सुरू केली आहे. ही एक सरकारी स्पर्धा असेल. या स्पर्धेत अमेरिकेच्या किंडरगार्टनपासून ते 12व्या वर्गात शिकत असलेले विद्यार्थीही सहभाग घेऊ शकतात. ही AI चॅलेंज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानंतर सुरू झाली आहे. या स्पर्धेचा उद्देश अमेरिकेत AI एज्युकेशनला प्रोत्साहन देणे असा आहे. जिंकणाऱ्याला 10 हजार डॉलर अर्थात 8.78 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर जाणून घेऊयात, नेमकी काय आहे ही चॅलेंज?
नेमकी चॅलेंज काय? -मेलानिया ट्रम्प यांनी सुरू केलेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या टीम एकत्रितपणे पूर्ण करेल. वेगवेगळे टीम असतील आणि त्यांना एका मार्गदर्शकासोबत एकत्र काम करावे लागेल. विद्यार्थ्यांच्या टीमला एआय टूल्स वापरून एक अॅप, वेबसाइट किंवा डिव्हाइस तयार करायचे आहे, जे समाजाच्या एक अथवा अनेक समस्या समस्या सोडवू शकेल. यासाठीची नोंदणी मंगळवारपासून सुरू झाली असून प्रोजेक्ट सादर करण्याची शेवटची तारीख डिसेंबर महिन्यात आहे.
संपर्धा जिंकणाऱ्याला काय मिळणार...? स्पर्धेतील विजेत्याला मोठी रक्कम मिळणार आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक टीमला प्रेसिडेंशिअल सर्टिफिकेट मिळेल. याशिवाय, प्रत्येक पातळीवर वेगवेगळे पुरस्कार दिले जातील. राज्य पातळीवरील विजेत्यांना प्रेसिडेंशिअल सर्टिफिकेट ऑफ अचीव्हमेंट, क्लाउड क्रेडिट्स आणि काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा अॅक्सेस मिळेल. याशिवाय, वाशिंगटन डीसीमध्ये तीन दिवसांच्या एका कार्यक्रमात भाग घेण्याची संधीही मिळेल. जेथे निवड झालेल्या प्रोजेक्ट्सचे व्हाइट हाउसमध्ये प्रदर्शित केले जाईल. तसेच, राष्ट्रीय विजेत्यांना प्रेसिडेंशिअल अवार्ड सर्टिफिकेट, क्लाउड क्रेडिट्स आणि 10,000 डॉलरचे बक्षीस मिळणार आहे.