शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

ट्रम्प यांचे धक्कातंत्र, पॅरिस करारातून घेतली माघार; डब्ल्यूएचओमधून पडले बाहेर; बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णय २४ तासांतच फिरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 06:11 IST

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णयही फिरवले आहेत.

वाॅशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत जगाला हादरवणारे अनेक निर्णय घेतले. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या काळातले ७८ निर्णयही फिरवले आहेत.

सत्तेवर आल्यावर ट्रम्प यांनी पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातल्या २०० देशांनी एकत्र येऊन हवामान बदलासाठी आणि पृथ्वीचे तापमान नियंत्रित राहावे यासाठी केलेला हा अतिशय महत्त्वाचा करार आहे. याआधी २०१७ला ट्रम्प पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हाही अमेरिकेने पॅरिस करारातून माघार घेतली होती. २०२१ मध्ये बायडेन सत्तेवर  आल्यावर अमेरिका पुन्हा करारात सहभागी झाली.

आरोग्य संघटनेमधून बाहेरजागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्लूएचओ या महत्त्वाच्या संस्थेतून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे. कोविड महासाथीच्या काळात डब्लूएचओने केलेल्या कामगिरीवर ट्रम्प यांनी टीका केली होती. त्यावेळीच त्यांनी संघटनेतून बाहेर पडण्याची सुरुवात केली होती. मात्र, नंतर बायडेन यांनी त्यांचा निर्णय रद्द केला होता.

कॅपिटॉल हिल हल्ला माफीराष्ट्राध्यक्ष होताच, ट्रम्प यांनी ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल हिल हिंसाचारासाठी अटक केलेल्या त्यांच्या सुमारे १,५०० समर्थकांना माफ केले. या लोकांनी काहीही चुकीचे केले नव्हते असे म्हणत, त्यांना ‘माफ’ केले आहे.

स्थलांतरावर बंदीस्थलांतरितांसाठींच्या योजनेलाही ट्रम्प यांनी स्थगिती दिली. या योजनेअंतर्गत, क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला येथील ३० हजार स्थलांतरितांना अमेरिकेत येण्याची परवानगी दिली होती. (वृत्तसंस्था)

‘मेक्सिकोमध्ये राहा’ ट्रम्प यांनी मेक्सिकोहून येणाऱ्या निर्वासितांसाठी कार्यकारी आदेशही जारी केले आहेत. मेक्सिको सीमेवर जास्त सैनिक तैनात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जीव वाचविल्याचे बक्षीसट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले होते. यावेळी शॉन करन यांनी ट्रम्प यांचा जीव वाचवला. आता ट्रम्प यांनी करन यांची गुप्तचर सेवेचे संचालक म्हणून नियुक्ती देत मोठे बक्षीस दिले.

टिकटॉक सध्या सुरू ट्रम्प यांनी चिनी मालकीची सोशल मीडिया कंपनी टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्यावरील निर्देशावरही स्वाक्षरी केली आहे. आता टिकटॉकवरील बंदी ७५ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.

मेक्सिको सीमेवर पुन्हा भिंत  अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर आणीबाणीच्या घोषणेचा एक भाग म्हणून, ट्रम्प यांनी अधिकाऱ्यांना ‘दक्षिण सीमेवर भिंत बांधण्याचे’ काम पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.हे निर्देश कार्यकारी आदेश नाहीत आणि अशा प्रयत्नांसाठी पैसे कुठून येतील हे स्पष्ट नाही. सरकारी नियुक्त्या थांबवल्यालष्करी आणि इतर काही भरती वगळता सर्व संघीय भरती थांबविण्याच्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ट्रम्प प्रशासन पूर्णपणे सत्ता हाती घेईपर्यंत ही बंदी कायम राहील.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited Statesअमेरिका