शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

"मी हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांचा जीव गेला असता!"; डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:44 IST

Trump State of the Union 2026: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत 'स्टेट ऑफ द युनियन' भाषण दिले. यामध्ये त्यांनी भारत-पाकिस्तान अण्वस्त्र युद्ध रोखल्याचा आणि साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचा दावा केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावावर भाष्य करताना अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. "जर मी वेळेवर हस्तक्षेप केला नसता, तर पाकिस्तानी पंतप्रधानांना जीव गमवाला लागला असता," असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन संसदेत दिलेल्या आपल्या 'स्टेट ऑफ द युनियन २०२६' भाषणामध्ये भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाबाबत पुन्हा एकदा मोठा दावा केला आहे. भारत आणि पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर होते, परंतु आपल्या हस्तक्षेपामुळे हे युद्ध थांबले आणि साडेतीन कोटी लोकांचे प्राण वाचले, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

'पहलगाम' दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार प्रहार केले होते. या कारवाईमुळे दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली होती. ट्रम्प यांच्या मते, ही परिस्थिती अण्वस्त्र युद्धाच्या उंबरठ्यावर होती आणि दोन्ही देशांनी एकमेकांची अनेक लढाऊ विमाने पाडली होती.

ट्रम्प यांचा 'टॅरिफ'चा धाकट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना २०० टक्के आयात शुल्काची धमकी दिली होती. "तुम्ही युद्ध थांबवले नाही, तर तुमच्याशी होणारा सर्व व्यापार बंद करू," असा सज्जड दम भरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोन्ही देशांनी युद्धविराम जाहीर केला, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. 

भारताची भूमिकादरम्यान, भारताने ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा नेहमीच फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी थेट चर्चेद्वारे हा युद्धविराम घडवून आणला होता. काश्मीर किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणताही विषय हा द्विपक्षीय असून, त्यात तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, हे भारताने सांगितले होते. तरीही ट्रम्प हे भारत-पाकिस्तान युद्धाबाबत दावे करतच आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump claims intervention saved Pakistani PM's life during India-Pak tension.

Web Summary : Trump claimed his intervention prevented war between India and Pakistan, saving millions. He threatened trade sanctions, leading to a ceasefire. India denies Trump's mediation, asserting bilateral talks resolved the issue.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका