शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

US Election: ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग अवघड; याचिका दाखल करून घेण्यास कोर्ट अनुत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 07:02 IST

सन २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडातील मतमोजणीसंदर्भात तिढा निर्माण झाला होता.

वॉशिंग्टन : अध्यक्षीय निवडणुकीत पराभव समोर दिसू लागताच आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेला सुप्रीम कोर्टात आव्हान देणयाची भाषा करणारे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र तसे करणे अंमळ कठीण जाणार असल्याचे चित्र आहे.सर्व वैध मते मोजली तर मीच पुन्हा अध्यक्ष होईन असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या राज्यांमध्ये फेरमतमोजणी करा, अशी मागणी करणाऱ्या ट्रम्प यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. निवडणूक प्रक्रियेला आक्षेप घेणाऱ्या याचिकाही त्यांच्या प्रचारयंत्रणेने काही राज्यांत दाखल केल्या. मात्र, त्यातल्या अनेक याचिका फेटाळून लावण्यात आल्या. परंतु तरीही सुप्रीम कोर्टात जाण्याचा त्यांचा इरादा पक्का आहे.

सन २००० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश आणि अल गोर यांच्यात फ्लोरिडातील मतमोजणीसंदर्भात तिढा निर्माण झाला होता. त्यावेळी बुश यांनी सुप्रीम कोर्टाकडे दाद मागितली होती. सुप्रीम कोर्टातील न्यायवृंदाने बुश यांच्या बाजूने निकाल देत फ्लोरिडात फेरमतमोजणी करण्याचे आदेश दिले होते. आताही ट्रम्प यांनी काही राज्यांत फेरमतमोजणीची मागणी केली असली तरी सुप्रीम कोर्टातील सहा न्यायाधीशांपैकी तीन न्यायाधीश ट्रम्प प्रशासनानेच नियुक्त केले आहेत. विद्यमान सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस् निवडणुकीसंदर्भातील याचिका दाखल करून घेण्यास फारसे उत्सुक नाहीत.  त्यामुळे ट्रम्प यांचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग अवघड असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनUS ElectionAmerica Election