Donald Trump : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नव्या अवतारात जगासमोर आले आहेत. त्यांनी आपली हेअरस्टाईल बदलली असून, याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या बदललेल्या लुकचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ट्रम्प पूर्वीपेक्षा खूपच वेगळे दिसत आहेत.
हा व्हिडिओ फ्लोरिडामधील ट्रम्प यांच्या खाजगी मालमत्तेतील 'ट्रम्प इंटरनॅशनल गोल्फ क्लब' मधील आहे. येथे समर्थकांकडून ट्रम्प यांजे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर ट्रम्प यांचा व्हिडीओ समोर येताच नेटकरी त्यांच्या नवीन हेअरस्टाइलवर प्रतिक्रिया देत आहेत.
या व्हायरल व्हिडीओने स्पष्ट केले आहे की, ट्रम्प आपल्या कार्यकाळाची सुरुवात नव्या उर्जेने आणि आत्मविश्वासाने करण्यास तयार आहेत. लोक त्यांची नवीन हेअरस्टाईल त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बदल आणि राजकीय ताकदीचे प्रतीक मानत आहेत.
नवीन लुकने लक्ष वेधून घेतलेनुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय नोंदवला. एकूण 295 इलेक्टोरल मते मिळवून त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. कमला यांना 226 इलेक्टोरल मते मिळाली. 20 जानेवारी 2025 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडले. या सोहळ्यापूर्वी ट्रम्प यांनी आपला लुक बदलल्याची चर्चा आहे.