अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर लादण्यास सुरूवात केली. हा कर २४ टक्क्यांपासून सुरू झाला होता, तो आता ५० टक्क्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. दरम्यान, आता अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनाही ट्रम्प यांनी झटका दिला. अमेरिकेने व्यावसायिक ट्रक चालकांना कामगार व्हिसा देण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली. भारतासह जगातील सर्व देशांसाठी कामगार व्हिसा निलंबित करण्यात आला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ट्रम्प यांनी नवीन नियम आणण्यास सुरुवात केली. त्यांनी घुसखोरी करणाऱ्यांविरोधात आधी कारवाई केली. दरम्यान, आता त्यांनी अन्य देशांवर टॅरिफ वाढवण्यास सुरुवात केली.
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
परराष्ट्रमंत्री रुबियो यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी व्हिसावरील बंदीबद्दल माहिती दिली. त्यांनी लिहिले की, अमेरिकेच्या रस्त्यांवर परदेशी चालकांकडून ट्रक आणि ट्रेलर चालवले जात असल्याने, व्यावसायिक ट्रक चालकांना दिले जाणारे कामगार व्हिसा तात्काळ बंद करण्यात आले आहेत, यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यांच्यामुळे अमेरिकन चालकांच्या नोकऱ्यांनाही धोका निर्माण होत आहे, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
एका अपघातामुळे घेतला निर्णय
काही दिवसापूर्वी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे एक अपघात झाला होता. हरजिंदर सिंह या भारतीय ड्राइव्हरने फ्लोरिडामध्ये चुकीच्या पद्धतीने ट्रक चालवला, यावेळी मोठी अपघात झाला. या अपघातामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर त्या ड्राइव्हरला पोलिसांनी अटक केली. यानंतर बाहेरच्या देशातील ड्राइव्हरांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेकायदेशीर परवान्यांवर अंकुश लावला
फ्लोरिडामध्ये एका ट्रक ड्रायव्हरच्या चुकीमुळे एक अपघात झाला, जो कधीही घडायला नको होता. आमची टीम डीएचएस सोबत जवळून काम करेल आणि बेकायदेशीर परदेशी लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यापासून रोखणे आणि बेकायदेशीर परवाने मिळवणाऱ्यांवर कारवाई करणे हे उद्दिष्ट असेल, हे अमेरिकन ड्रायव्हर्स आणि लोकांचे जीवन धोक्यात घालत आहेत, असंही अमेरिकन सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी सोशल मीडियावर लिहिले.