America Iran War: ३९ दिवस सुरू असलेले युद्ध थांबण्यासाठी इराणने १० कलमी प्रस्ताव पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला पाठवला होता. दोन्ही देशांच्या प्रमुखांनी युद्धविराम करण्याला सहमती दर्शवली होती. परंतु, आता वेगळीच माहिती समोर येत आहे. इराणने पाठवलेला १० कलमी प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केराच्या टोपलीत टाकल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे.
३९ दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेने इराणसोबत दोन आठवड्यांचा युद्धविराम केल्याची घोषणा झाल्यानंतर जगाने सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले सुरूच ठेवल्याच्या रागात इराणने होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचे जाहीर केले. आता हा मार्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी अमेरिकेने केली आहे. अमेरिकेला इस्रायलच्या माध्यमातून सुरू असलेले युद्ध किंवा युद्धविराम यांपैकी एकाची निवड करावी लागेल, असा थेट इशारा इराणने दिला आहे. यानंतर आता व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी इराणच्या प्रस्तावावर स्पष्टीकरण दिले.
इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली
अमेरिकी सिनेटरने ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याची टीका केली होती. तसेच त्यांना पदावरून हटवण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्याचे आवाहन केले. इराणचा १० कलमी प्रस्ताव स्वीकारणे म्हणजे ट्रम्प यांनी शरणागती पत्करल्याचे सूचक आहे, अशी टीकाही करण्यात आली होती. यानंतर आता व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दावा केला आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव कचऱ्यात फेकून दिला. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली आहे. आम्हाला इराणकडून एक प्रस्ताव मिळाला आहे, जो वाटाघाटींसाठी एक व्यवहार्य आधार आहे, असेही म्हटले आहे.
दरम्यान, कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, इराणचा सुरुवातीचा १० कलमी प्रस्ताव स्वीकारता येण्यासारखा नव्हता. तो पूर्णपणे नाकारण्यात आला होता. तथ्यांशी संबंधित नसलेल्या कोणत्याही गोष्टीला प्रसिद्धी देऊ नये. ट्रम्प तडजोड म्हणून इराणच्या मागण्यांचा प्रस्ताव कधीही स्वीकारणार नाहीत. ट्रम्प केवळ अशाच कराराचा पाठपुरावा करतील जो अमेरिकन लोकांच्या सर्वोत्तम हिताचा असेल, असे व्हाइट हाऊसने स्पष्ट केले.
Web Summary : White House disclosed Trump rejected Iran's 10-point peace proposal, conveyed via Pakistan, amidst ongoing tensions. Despite initial ceasefire talks, the proposal was deemed unacceptable, with Trump pursuing only deals beneficial to America.
Web Summary : व्हाइट हाउस ने खुलासा किया कि ट्रंप ने पाकिस्तान के माध्यम से भेजे गए ईरान के 10-सूत्रीय शांति प्रस्ताव को अस्वीकार कर दिया। प्रारंभिक युद्धविराम वार्ता के बावजूद, प्रस्ताव अस्वीकार्य माना गया, और ट्रंप केवल अमेरिका के लिए फायदेमंद सौदे करेंगे।