शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

‘शुल्कामुळे आर्थिक व्यापार युद्ध सुरू होईल’, समर्थकानेच डोनाल्ड ट्रम्प यांचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:18 IST

Donald Trump Tariff War: अब्जाधीश फंड मॅनेजर आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक बिल ऍकमन यांनी व्यापार युद्धाचा गंभीर धोका अधोरेखित केला.

Bill Ackman Warns Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वच देशांवर टॅरिफ लादल्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे जागतिक मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे इतर देशांसह अमेरिकन उद्योगपतीही घाबरले आहेत. त्यांच्या समर्थकांचाही आता संयम सुटला असून, त्यांनी हा आर्थिक वेडेपणा थांबवण्याचे आवाहन केले आहे.

अब्जाधीश फंड मॅनेजर आणि ट्रम्प यांचे समर्थक बिल ऍकमन यांनी तर एकाच वेळी सर्व देशांवर भारी शुल्क लादणे म्हणजे आर्थिक युद्ध छेडण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ॲकमन यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले  की, अमेरिकेचे प्रमुख दिग्गज उद्योगपतींचा विश्वास गमावत आहेत, त्यांनी हे व्यापार युद्ध थांबवले पाहिजे. राष्ट्राध्यक्षांना वाटाघाटीद्वारे व्यापार समस्या सोडवण्याची 90-दिवसांची संधी आहे, असेही आहे.

'आर्थिक आण्विक युद्ध सुरू झाले तर...'ते पुढे म्हणाले, दुसरीकडे आपण जगातील प्रत्येक देशावर आर्थिक अणुयुद्ध छेडले, तर व्यवसायातीलगुंतवणूक गोठवली जाईल, ग्राहकांची पाकीट आणि बचत खाती गोठवली जातील आणि जगभरात आपली प्रतिष्ठा खराब होईल. ही प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी अनेक वर्षे आणि कदाचित दशके लागतील. ट्रम्प यांनी शुल्काला जागतिक मुद्दा बनवून योग्य पाऊल उचलले होते, परंतु आता याने धोकादायक वळण घेतले आहे. हे थांबले पाहिजे, अन्यथा देश विनाशाकडे जाईल. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक