शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

ट्रम्प समर्थकांचा राडा, अमेरिकी संसद धरली चार तास वेठीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:34 IST

Donald Trump: हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी; १२ जणांना अटक

वॉशिंग्टन : जगातील सगळ्यात जुनी लोकशाही असा लौकिक असलेल्या अमेरिकी लोकशाहीसाठी बुधवारचा दिवस सर्वांत काळाकुट्ट ठरला. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांच्याकडे आता अमेरिकीची सूत्रे जाणार, हे स्पष्ट होताच शेकडो ट्रम्प समर्थकांनी थेट अमेरिकी संसदेवरच हल्ला चढवला. कॅपिटॉल हिल परिसरातील संसद इमारतीत घुसून ट्रम्प समर्थकांनी कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या हिंसाचारात चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले. आंदोलकांनी चार तास संसद वेठीस धरली होती.  

अमेरिकी संसदेत बुधवारी मतदारवृंदाच्या मतांची मोजणी सुरू होती. या घटनात्मक प्रक्रियेत बायडेन यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मात्र, मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना ट्रम्पसमर्थकांनी संसद परिसरात गोळा होण्यास सुरुवात केली. वाढलेल्या गर्दीने एका क्षणी संसदेभोवतालचे सुरक्षा कडे तोडत संसदेच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. या तणावाच्या वातावरणात पोलीस बंदोबस्तही तोकडा पडला. 

ट्रम्प यांचे आधी समर्थन नंतर आवाहनसंसद परिसरात जसजशी आपल्या समर्थकांची गर्दी होऊ लागली तसतसा मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात उत्साह संचारला. त्यांनी अधिक संख्येने लोकांनी यावे, असे आवाहन केले. 

मात्र, समर्थकांनी हिंसाचार करण्यास सुरुवात करताच ट्रम्प यांनी ‘या निवडणुकीत निश्चितच घोटाळा झाला आहे. परंतु तुम्ही त्यांच्या हातचे बाहुले होऊ नका. शांतता राखा आणि घरी जा,’ असे आवाहन समर्थकांना केले.ट्रम्प यांनी समर्थकांना चेतविण्यासाठी आपल्या व्यासपीठाचा वापर केल्याबद्दल ट्विटर आणि फेसबुक यांनी अनुक्रमे १२ आणि २४ तासांसाठी ट्रम्प यांचे अकाउंट निलंबित केले.

अध्यक्षपदावर बायडेन n ट्रम्प समर्थकांनी केलेल्या अभूतपूर्व गोंधळानंतर अमेरिकी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन शांततेत पार पडले. गुरुवारी पहाटेपर्यंत हे कामकाज सुरू होते. यावेळी जो बायडेन यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले. n आता २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्षपदाची शपथ घेतील तर कमला हॅरिस अमेरिकी इतिहासातील पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील.

लोकशाही अमेरिकेत असा काळाकुट्ट क्षण येऊन ठेपला हे पाहणे अतीव दु:खदायक आहे. आमच्या लोकशाहीवर अभूतपूर्व असा हल्ला झाला आहे. परंतु कॅपिटॉल हिल परिसरातील दृश्य ही खरी अमेरिका नाही. हे आता संपायला हवे.     - जो बायडेन, नवनिर्वाचित अध्यक्ष

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUS Riotsअमेरिका-हिंसाचार