शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

'डोनाल्ड ट्रम्प यांना अणुऊर्जा चर्चा संपत्तीच्या वाटाघाटीसारखी वाटते", इराणचा मंत्री अमेरिकेच्या अध्यक्षांवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:05 IST

Iran America Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर धोका दिल्याचा आरोप करत इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खडेबोल सुनावले आहे. अणुऊर्जेशी संबधित चर्चा ट्रम्प यांना संपत्तीच्या वाटाघाटीसारखी वाटते, असे ते म्हणाले. 

अमेरिका-इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर मध्य पूर्वेत युद्धाला तोंड फुटले. हा संघर्ष वाढला असून, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चर्चेचे गांभीर्य नसल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे केला आहे. अणुऊर्जेवरील चर्चा ट्रम्प यांना संपत्तीची देवाण-घेवाण करण्यासारखी वाटते, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी सुनावले. 

इराणचे मंत्री ट्रम्प यांच्याबद्दल काय बोलले?

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी एक पोस्ट केली आहे. अरागची म्हणाले, "जेव्हा अवघड अशा अणुऊर्जेवरील चर्चेला संपत्तीच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार असल्यासारखे समजले जाते. जेव्हा मोठ्या खोट्या गोष्टी सत्य गोष्टींना झाकून टाकते, तेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाही, ज्या वास्तवापासून दूर आहेत."

"याचा परिणाम म्हणजे रागातच चर्चेचा टेबल बॉम्बने उडवण्यासारखे आहे. ट्रम्प यांनी डिप्लोमसीसोबतच त्या अमेरिकन लोकांचाही विश्वासघात केला आहे, ज्यांनी त्यांना निवडून दिले आहे", अशी टीका अरागची यांनी केली. 

मंगळवारी बोलताना अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी असा दावा केला होता की, इराणला चर्चा करायची आहे, पण आता खूप उशीर झाला आहे. ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला होता. इराणचे संरक्षणप्रमुख अली लारीजानी यांनी म्हटले होते की, आम्ही अमेरिकेसोबत चर्चा करणार नाही.

इराणला इस्रायलची नवी धमकी

अयातुल्लाह अली खामेनेई यांचा दफनविधी होणार आहे. त्यांच्या दफनविधीपूर्वी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.  दरम्यान, इस्रायलचे संरक्षण मंत्री इसरायल कात्झ यांनी इराणला धमकी दिली आहे. "जो कोणी उत्तराधिकारी इस्रायलला संपवण्याचा प्रयत्न करेन किंवा अमेरिकेला धमक्या देईल आणि इराणच्या लोकांना दाबून ठेवेन, तोच आमचे टार्गेट असेल", असे कात्झ यांनी म्हटले आहे. 

ट्रम्प यांची स्पेनला धमकी

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी स्पेनला व्यापार बंद करण्याची धमकी दिली आहे. अमेरिकेला इराणविरोधात लढण्यासाठी स्पेनमधील लष्करी तळांचा वापर करायचा आहे. मात्र, या लष्करी तळांचा वापर करण्यास स्पेनने अमेरिकाला नकार दिला. 

ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये बोलताना म्हणाले, "आम्ही स्पेनसोबतचा सर्व व्यापार बंद करू शकतो. आम्हाला स्पेनसोबत कोणताही व्यवहार ठेवायचा नाहीये. स्पेनचे वागणे खूपच वाईट झाले आहे."

"स्पेनने आम्हाला त्यांचे लष्करी तळ वापरण्यास नकार दिला आहे. पण, आमची ठरवले तर थेट त्यांच्या लष्करी तळांचा वापर करू शकतो. पण, आम्हाला त्याची गरज पडणार नाही. स्पेनकडे चांगल्या लोकांशिवाय कोणतीही चांगली गोष्ट नाहीये, ज्याची आम्हाला गरज पडेल. आम्ही स्पेनसोबतचे सर्व संबंध तोडू", असे ट्रम्प म्हणाले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran slams Trump: Nuclear talks like property deal for him.

Web Summary : Iranian minister criticizes Trump, viewing nuclear talks as property deals, not serious diplomacy. Iran rejects talks with US, while Israel threatens retaliation against future Iranian leaders. Trump threatens Spain over military base access denial.
टॅग्स :Iranइराणwarयुद्धAmericaअमेरिका