शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन बाइकवर भारताकडून 100 % टॅक्सवसुली, आम्हाला मूर्ख समजलात काय?, ट्रम्प यांचा मोदींना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 10:34 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला लक्ष्य केलं आहे. भारत अमेरिकेच्या मोटारसायकलवर 100 टक्के आयात शुल्क आकारत होता. आता त्यांनी तो 50 टक्के केला असला तरी जास्तच आहे. आमच्यासाठी हे स्वीकारार्ह नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी भारतावर आगपाखड केली आहे. अमेरिकाला आता आणखी मूर्ख बनवता येणार नाही. आमचा देश मूर्ख नाही. जेणेकरून त्याला फसवलं जाईल. भारत आमचा मित्र देश आहे. मोदी तुम्ही आमच्या मोटारसायकलवर 100 टक्के कर लावलात. आम्ही तुमच्याकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारत नाही. ट्रम्प यांनी हार्ले डेव्हिडसन या बाइकवर लावल्यात येणाऱ्या आयात शुल्कासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. भारतानं यावर लावलेला आयात शुल्क शून्य करायला हवा, अशी ट्रम्प यांची अपेक्षा आहे. अमेरिकेची मोटारसायकल जेव्हा भारतात जाते तेव्हा त्यावर 100 टक्के कर लावला जातो. परंतु भारताची मोटारसायकल अमेरिकेत विक्रीसाठी आणल्यास कोणताही कर आकारला जात नाही. यासंदर्भात मी मोदींशी चर्चा करणार असून, हे स्वीकारार्ह नसल्याचं स्पष्ट शब्दात सांगणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. पुढे ट्रम्प म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन कॉल केल्यानंतर त्यांनी 100 टक्क्यांवरचा आयात शुल्क 50 टक्क्यांवर आणलं. परंतु तेसुद्धा मला स्वीकार नाही. त्या  मोटारसायकलवरचं आयात शुल्क पूर्णतः हटवलं गेलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. अमेरिका आणि भारतादरम्यान बाइकवर लावण्यात येणारं आयात शुल्क कमी करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. अमेरिका ही काही बँक नाही. प्रत्येक जण या बँकेला लुटण्याचा प्रयत्न करतोय आणि हे बऱ्याच काळापासून होत आलं आहे. अमेरिकेचा इतर देशांबरोबर असलेला व्यापार तोट्यात आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी