शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प रिटर्न्स! अडीच वर्षांनी पहिले ट्विट; म्हणाले 'सरेंडर कधीच नाही...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 10:36 IST

ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला होता. खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असे सांगण्यात येत होते.

जानेवारी 2021 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट कायमचे सस्पेंड करण्यात आले होते. अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी ते पुन्हा सुरु केले होते. परंतू, आजवर ट्रम्प यांनी ट्विटर वापरले नव्हते. आज त्यांनी अडीच वर्षांनी पहिले ट्विट केले आहे. यावरून डोनाल्ड ट्रम्प रिटर्न्सची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. 

मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स असे केले आहे. तसेच युआरएल ट्विटर असेच ठेवले आहे. अमेरिकेत आज नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. निवडणुकीचा निकाल बदलवल्याच्या आरोपात आज ट्रम्प यांना चौथ्यांदा अटक करण्यात आली होती. ट्रम्प हे न्यायालयाच्या आदेशानंतर आज सरेंडर झाले, परंतू मगशॉट देऊन २० मिनिटांत पुन्हा ते बाहेर पडले. 

बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांनी तुरुंगाने जारी केलेला मग शॉट वापरत 'निवडणुकीत हस्तक्षेप, कधीच सरेंडर करणार नाही' असे त्या फोटोवर लिहित ट्विटरवर पोस्ट केला आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी ८ जानेवारी २०२१ ला शेवटचे ट्वीट केले होते. आता त्याला अडीच वर्षे झाली आहेत. मे २०२२ मध्ये मस्क यांनी ट्रम्प यांच्यावरील प्रतिबंध मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते. 

मस्कनी पोल घेतलेला...ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनी एका ट्विटमध्ये ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा सुरू करायचे का? याबाबतचा पोल घेतला. त्यावर कोट्यवधी लोकांनी आपाल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. पोलमधील निर्णयानुसार मस्क यांनी टॅम्प यांचं ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केले होते. पण खुद्द ट्रम्प यांनाच ट्विटरवर पुनरागमन करण्यात रस राहिलेला नाही असे सांगण्यात येत होते. अखेर आज ट्रम्प यांना ट्विटरवर येण्याचा मोह आवरलेला नाहीय.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पTwitterट्विटर