शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump Porn Star Case : पॉर्न स्टार प्रकरणावरील सुनावणी संपली, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ज्युरीनं लावले 34 आरोप, दंडही भरावा लागणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 02:22 IST

ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तब्बल 34 आरोप लावले. यावर, ट्रम्प यांनी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे सांगितले.

न्यूयॉर्क - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरणात मॅनहॅटन कोर्टात हजर झाले होते. ट्रम्प न्यायालयात पोहोचताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर, ग्रँड ज्युरीच्या आरोपांचे न्यायालयात वाचन करण्यात आले. ज्युरीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तब्बल 34 आरोप लावले. यावर, ट्रम्प यांनी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचे सांगितले. यावेळी न्यायालयाने ट्रम्प यांना 1.22 लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. याच बरोबर, डोनाल्ड ट्रम्प हे गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्रपती ठरले आहेत.

न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीने ट्रम्प यांच्यावर आरोप लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांनी लावलेले आरोप अद्याप सार्वजनिक केलेले नाहीत. त्यामुळे, डिस्ट्रिक अटॉर्नींसमोर ट्रम्प यांच्या विरोधात काय काय आरोप करण्यात आले? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. आरोप असलेले सीलबंद पाकीट आज औपचारिकपणे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? -अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच, 2016 मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 130,000 डॉलर दिल्याबद्दल अटक होण्याची शक्यता व्यक्त केली होती. खरे तर हे प्रकरण 2006 चे आहे. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने 2011 मध्ये 'इन टच वीकली'ला दिलेल्या मुलाखतीत आरोप केला होता की, डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला डिनरसाठी आमंत्रित केले होते आणि ती त्यांना भेटण्यासाठी हॉटेलच्या एका खोलीत गेली होती. ही मुलाखत 2011 मध्येच देण्यात आली होती, पण ती ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर 2018 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.

तत्पूर्वी, ट्रम्प पोहोचण्यापूर्वीच न्यायालयाबाहेर आणि आतही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. ट्रम्प आठ गाड्यांच्या ताफ्यासह न्यायालयाच्या परिसरात पोहोचले. न्यायालयात हजर होण्यापूर्वी ट्रम्प मॅनहॅटन डिस्ट्रिक्ट अॅटर्नीच्या कार्यालयात पोहोचले तेथे पोलिसांनी त्यांना अटक केली.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका