शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
3
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
4
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
5
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
6
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
7
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
9
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
10
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
11
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
12
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
13
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
14
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
15
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
16
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
17
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
18
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
19
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
20
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 09:04 IST

Mike Waltz : डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदार माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे.

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकल्यानंतर आपली नवीन टीम तयार करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहे. मात्र, याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागून एक मोठ्या पदांसाठी लोकांची निवड करण्यास सुरुवात केली आहे. 

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदार माईक वॉल्ट्झ यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. माईक वॉल्ट्झ हे चीनचे कट्टर टीकाकार मानले जातात. तसेच, अमेरिकेच्या सिनेटमधील इंडिया कॉकसचे प्रमुख माईक वॉल्ट्झ हे अमेरिकेसाठी मजबूत संरक्षण धोरणाचे समर्थन करतात. देशाची सुरक्षा आणखी बळकट करण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनांचे ते खंबीर समर्थक आहेत. 

रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील दीर्घकाळ चाललेल्या युद्धात माईक वॉल्ट्झ महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. माईक वॉल्ट्झ यांनी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅपिटल हिल येथे ऐतिहासिक भाषण आयोजित करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, सिनेटच्या इंडिया कॉकसमध्ये एकूण ४० सदस्य आहेत. २००४ मध्ये न्यूयॉर्कच्या तत्कालीन सिनेटर हिलरी क्लिंटन आणि सिनेटर जॉन कॉर्निन यांनी इंडिया कॉकसची स्थापना केली होती. हे सिनेटमधील सर्वात मोठे कॉकस आहे.

कोण आहेत माईक वॉल्ट्झ?५० वर्षीय माईक वॉल्ट्झ हे आर्मी नॅशनल गार्डचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी तीन वेळा फ्लोरिडाचे संसदेत प्रतिनिधित्व केले आहे. ते सदन सशस्त्र सेवा उपसमितीचे अध्यक्ष राहिले आहेत. तसेच, माईक वॉल्ट्झ हे सभागृहाच्या परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्यही राहिले आहेत. याशिवाय, माईक वॉल्ट्झ यांना लष्कराचा व्यापक अनुभव आहे. त्यांनी व्हर्जिनिया मिलिटरी इन्स्टिट्यूटमधून पदवी प्राप्त केली आणि फ्लोरिडा गार्डमध्ये सामील होण्यापूर्वी चार वर्षे सैन्यात सेवा केली. ते अफगाणिस्तान, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील युद्धात सामील झाले होते. तसेच, त्यांनी पेंटागॉनमध्ये धोरण सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय