शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर 18 हजार भारतीयांवर धोक्याची घंटा, मायदेशी पाठवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 19:09 IST

Bloomberg Claim: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनताच पुन्हा एकदा अवैध स्थलांतरितांचा मुद्दा समोर आला आहे.

Donald Trump On Illegal Immigrants: डोनाल्ड ट्रम्प यांनी काल(20 जानेवारी) अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. दरम्यान, पदभार स्विकारताच ट्रम्प अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. यात अवैध स्थलांतरितांचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेत राहणाऱ्या हजारो भारतीयांचे भविष्य धोक्यात आले आहे.

ब्लूमबर्गच्या दाव्यानुसार, ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अवैधरित्या अमेरिकेत राहणाऱ्या 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाऊ शकते. या मुद्द्यावर भारत आणि अमेरिके एकमेकांना सहकार्य करण्यास तयार आहेत. बेकायदेशीर घुसखोरी हा ट्रम्प यांचा मोठा निवडणूक मुद्दा राहिला आहे. याविरोधात ट्रम्प यांनी एक कार्यकारी आदेश जारी केला आहे. अमेरिकेच्या गृह विभागाने 2022 साली यासंबंधीची आकडेवारी जाहीर केली होती. आता याबाबत काय निर्णय घेतला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शपथ घेताच अवैध स्थलांतरितांबाबत घोषणाडोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या मोठ्या घोषणांमध्ये अवैध स्थलांतरितांचा मुद्दाही सामील आहे. बेकायदेशीरपणे अमेरिकेत येणाऱ्या लोकांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अमेरिकेत सुमारे लाखो भारतीय बेकायदेशीरपणे राहत असल्याचा अंदाज आहे. पीयू संशोधन केंद्राच्या 2022 च्या मूल्यांकनानुसार, एकूण 10.10 कोटी लोक अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहतात.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?ट्रम्प यांनी अमेरिका-मेक्सिको सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच, बेकायदेशीर प्रवेश ताबडतोब बंद केला जाईल आणि लाखो अवैध स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळेच आता अमेरिकेत राहणाऱ्या अवैध स्थलांतरितांना धोका निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारत