शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'पुतिन यांना समजावून सांगा..', डोनाल्ड ट्रम्प यांचे चीनला रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 19:16 IST

Donald Trump on China: चीनवर वारंवार टीका करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे.

Donald Trump on China: चीनवर वारंवार टीका करणारे अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. सीरियात बशर अल-असद यांचे सरकार कोसळल्यानंतर ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, रशियाने आता समजूतदारपणे वागावे. त्यांना कळायला हवे की, त्यांची आणि इराणची स्थिती कमकुवत झाली आहे. पुतिन यांना पटवून देण्यात चीन मदत करू शकतो. 

ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की, मी व्लादिमीर पुतीन यांना चांगले ओळखतो. त्यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली आहे. चीन यामध्ये मदत करू शकतो. रशिया आणि इराण सध्या कमकुवत स्थितीत आहेत. एक युक्रेनविरोधातील युद्धामुळे आणि दुसरा वाईट अर्थव्यवस्थेमुळे. इस्रायलही युद्धात यश मिळवत आहे. झेलेन्स्कींना हा सर्व वेडेपणा थांबवायचा आहे.  रशिया आणि इराण हे दोन्ही देश त्यांच्या सुरू असलेल्या युद्धांमुळे कमकुवत झाले आहेत. युक्रेनमधील युद्धात सुमारे 600,000 रशियन सैनिक जखमी किंवा ठार झाले आहेत. रशियानेही आता हे सर्व थांबवावे. हे युद्ध थांबवण्यासाठी चीन मदत करू शकतो, असेही ट्रम्प म्हणाले. 

सीरियातील संघर्षात अमेरिकेने पडू नयेसीरियात गृहयुद्धाची ठिणगी पडली आहे. यावर अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दूर राहण्याची भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भूमिका मांडता म्हटले की, अमेरिकेने सीरियातील संघर्षामध्ये पडू नये. सीरिया एक समस्याग्रस्त देश आहे. पण, आमचा मित्र नाहीये. अमेरिकेला याच्याशी काही देणं घेणं नसले पाहिजे. ही आमची लढाई नाहीये. हे चालू द्याव, यात सहभागी होऊ नये, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाchinaचीनRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया