Donald Trump ( Marathi News ) : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला जगभरातून दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प अॅक्शनमोडवर आले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांवर पहिल्यांदा कारवाई केली आहे.
बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेताच पहिल्यांदा त्यांनी स्थलांतरितांवर कारवाई सुरू केली. पहिली स्वाक्षरी त्यांनी याबाबत काढलेल्या आदेशावर केली. ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठी सामूहिक हद्दपारी मोहीम सुरू केली आहे. अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांमध्ये भारतीयांची संख्याही मोठी आहे. यामुळे या निर्णयाचा फटका भारतीयांनाही बसणार आहे.
मेक्सिकन आणि एल साल्वाडोर नंतर अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांमध्ये भारतीयांचा तिसरा नंबर लागतो. आता अमेरिका बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या तयारीत आहे, ही मोठी चिंतेची बाब आहे.
प्रत्येक वर्षी २ लाख लोकांना हद्दपार केले जाते
अमेरिकेतील बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना बाहेर काढणे ही कारवाई नवीन नाही. याआधीही अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. २०१३- १४ पासून प्रत्येक वर्षी २ लाख पेक्षा जास्त लोकांना बेकायदेशीर आलेल्या लोकांना हद्दपार केले जाते. बराक ओबामा ज्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यावेळी ४ वर्षात १० लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना अमेरिकेतून हद्दपार केले होते.
या पद्धतीनेच डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ ठरला आहे. त्यांनी पहिल्या टर्ममध्ये ७.७ लाख लोकांना अमेरिकेतून हद्दपार केले.तर जो बायडेन यांच्या कार्यकाळात सुमारे ४.९ लाख लोकांना हद्दपार केले.
आकडे काय सांगतात?
न्यायॉर्क टाइम्सने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ९०,००० भारतीयांना अटक केली आहे.
२०२३ मध्ये जवळपास १००० भारतीयांना अमेरिकेतून परत पाठवले आहे.
ट्रम्प यांनी बांगलादेशची मदत थांबवली
डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशावर मोठी कारवाई केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे तीन महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID/बांगलादेश करार, कार्य आदेश, अनुदान, सहकारी करार किंवा इतर सहाय्य किंवा संपादन साधनांतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवण्याचे किंवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी अनेक देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर ९० दिवसांसाठी बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी युक्रेनला देण्यात येणारी मदत थांबवली होती.