शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

US Election: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचा कारनामा; भारताच्या नकाशातून काश्मीर हटवलं अन्...

By प्रविण मरगळे | Updated: November 4, 2020 08:31 IST

US Election, Donald Trump, Joe biden News: या नकाशामध्ये लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत

ठळक मुद्देबायडनला पाठिंबा देणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.ट्रम्प यांचे समर्थक म्हणून पाकिस्तान, रशिया आणि इराण यांचा उल्लेख करण्यात आला डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटच्या अध्यक्षीय चर्चेत पर्यावरणाच्या मुद्यावरुन भारताला लक्ष्य केले होते.

वॉश्गिंटन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे पडसाद भारतात उमटू लागले आहेत. ज्यो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अमेरिकेत कडवी लढत आहे. या निवडणुकीत बाजी कोण मारतं याकडे सर्व जगाचे लक्ष आहे. त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाने जगाचा नकाशा प्रसिद्ध करत वडील डोनाल्ड ट्रम्प आणि प्रतिस्पर्धी ज्यो बायडन यांच्या समर्थक देशांना दोन रंगात विभागलं आहे. मात्र यात भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

या नकाशामध्ये लाल रंगात डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडनचे समर्थन करणारे देश निळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत. या फोटोमध्ये काश्मीर हा पाकिस्तानच्या भागाचा भाग म्हणून भारताच्या नकाशावर दाखविण्यात आला आहे. तसेच, बायडनला पाठिंबा देणार्‍या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. ट्रम्प यांचे समर्थक म्हणून पाकिस्तान, रशिया आणि इराण यांचा उल्लेख करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी ट्विट करत म्हटलंय की, “बरोबर, मी अंदाज लावलेला निवडणुकीचा नकाशा तयार झाला आहे”

डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारतावर निशाणा साधला

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चांगले संबंध आहेत. असे असूनही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटच्या अध्यक्षीय चर्चेत पर्यावरणाच्या मुद्यावरुन भारताला लक्ष्य केले. हवामान बदलांवर भाष्य करताना ते म्हणाले की, चीन आणि रशिया व्यतिरिक्त, हवा खराब करण्यासाठी भारतच जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला.

लडाखमध्ये चीनशी झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत जवळीक वाढत आहे. या दोन्ही देशांच्या नौदलाने सध्या ऑस्ट्रेलिया आणि जपानबरोबर लष्करी सराव सुरु केला आहे. यावेळी अमेरिका चीनविरूद्ध भारताच्या बाजूने उभे असल्याचा दावा करत आहे.

दरम्यान, अमेरिकेत ४५ व्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे मतदान संपलं आहे. या शक्तीशाली पदासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन आमने-सामने आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकली, तर ते सलग दोन वेळा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणारे चौथे व्यक्ती ठरतील.

अर्कांससमध्ये ट्रम्प विजयी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अर्कांसस राज्यातही विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना येथे ६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. अर्कांसस हे एक शक्तिशाली रिपब्लिकन राज्य आहे.

ट्रम्प ४, तर बायडन ७ राज्यांत विजयी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलबामा, मिसिसिपी, ओक्लाहोमा आणि टेनेसी राज्यात विजय मिळवला आहे. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ज्यो बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेयर, इलिनोइस, मॅरीलँड, मॅसाचुसेट्स, न्यू जर्सी आणि रोड आयलँडमध्ये विजय मिळवला आहे. ट्रम्प यांना त्या चार राज्यांतून ३३ मते मिळाली तर बायडन यांना सात राज्यांतून एकूण ६९ मते मिळाली आहेत.

टॅग्स :US ElectionAmerica ElectionDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प