शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प सज्ज, अमेरिका इराणवर हल्ल्याच्या तयारीत; आठवड्याच्या शेवटी हल्ला करण्याच्या हालचाली सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 10:16 IST

गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधने तैनात केल्यानंतर, अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते, अशी माहिती व्हाइट हाऊसला देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या शेवटी इराणवर हल्ला करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले असून, या लष्करी कारवाईला अधिकृत मान्यता द्यायची की नाही, याबाबत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, असे वृत्त सीएनएन या वृत्तवाहिनीने दिले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात मोठ्या प्रमाणावर हवाई आणि नौदल संसाधने तैनात केल्यानंतर, अमेरिकेचे लष्कर या आठवड्याच्या अखेरीस हल्ल्यासाठी तयार असू शकते, अशी माहिती व्हाइट हाऊसला देण्यात आली आहे. मात्र, एका सूत्राने असे म्हटले आहे की, ट्रम्प यांनी खासगी चर्चेत लष्करी कारवाईच्या बाजूने आणि विरोधातही युक्तिवाद केला असून, सर्वोत्तम मार्ग कोणता असेल याबाबत त्यांनी आपले सल्लागार आणि मित्र राष्ट्रांचे मत जाणून घेतले आहे. दोन्ही देशांत जिनिव्हा येथे अणुकार्यक्रमाबद्दल चर्चा झाली असली तरी परस्पर देशांनी  प्रत्युत्तराचा इशाराही दिला होता. 

मार्को रुबियो लवकरच इस्रायल दौऱ्यावर जाणार

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या अणुचर्चेबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो पुढील आठवड्यात इस्रायलचा दौरा करणार असून, ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना माहिती देणार आहेत, अशी माहिती ट्रम्प प्रशासनातील दोन अधिकाऱ्यांनी दिली. रुबियो २८ फेब्रुवारी रोजी नेतन्याहू यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये अलीकडेच इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत अप्रत्यक्ष चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही बाजूंनी या आठवड्यात जिनिव्हात झालेल्या चर्चेवरील प्रगतीबद्दल सावध सकारात्मकता व्यक्त केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी मूलभूत मुद्द्यांवर सहमती झाल्याची प्रतिक्रिया दिली होती.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Readying US Military for Potential Iran Attack: Report

Web Summary : The US military is reportedly prepared to potentially attack Iran this week, awaiting President Trump's final approval. Trump is weighing options, consulting advisors on the best approach. Senator Rubio will visit Israel to discuss Iran nuclear talks with Netanyahu.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका