शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प रशियावर संतापले; म्हणाले, पुतिन उन्मत्त झालेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 11:20 IST

फेब्रुवारी २०२२ नंतरचा सर्वात मोठा हवाई हल्ला

वॉशिंग्टन : युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य शहरांवर रशियाने सलग तिसऱ्या रात्री केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतापले आहेत. या संतापाच्या भरात त्यांनी ‘पुतिन उन्मत्त झाले आहेत’, असे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. रविवारी रात्री रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला भयंकर होता. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली आहे. 

रविवारी सोशल मीडियावर पोस्ट करीत ट्रम्प यांनी म्हटले आहे की, ‘रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी माझे स्नेहाचे संबंध आहेत. परंतु, अशात त्यांचे काहीतरी बिघडले आहे. ते उन्मत्त झाले आहेत.’

रशियाने तीन दिवसांत कीव्हसह इतर शहरांवर प्रचंड प्रमाणात ड्रोन सोडले. विशेषत: रविवारी रात्री एकाच वेळी ३५५ ड्रोननी हा हल्ला करण्यात आला. यात किमान १२ लोक ठार झालेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर सर्वशक्तीनिशी केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे.

...तर रशियाचे पतन होईल

रशिया संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवू पाहत असेल तर यातून काहीच साध्य होणार नाही. उलट रशियाचेच यात पतन होईल, असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना दिला आहे.

युक्रेनला नवी ताकद

झेलेन्स्कींच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक वाक्याने सतत नव्या समस्या निर्माण होतात. हे मला अजिबात आवडणार नाही. ही बडबड थांबवली पाहिजे, असेही ट्रम्प यांनी सुनावले आहे.  अमेरिका, जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्सने युक्रेनला लष्करी पुरवठ्यावरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे युक्रेन प्रतिउत्तरदेण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन