शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 15:35 IST

Donalt Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यादरम्यान अहमद अल-शाराशी भेट घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Donalt Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सत्ता काबीज केल्यापासून आपल्या देशाचा व्यापार वाढवण्यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहेत. या कामात ते इतके बुडाले आहेत की, दहशतवाद्यांशी संबंध ठेवण्यातही मागचा पुढचा कुठलाही विचार करत नाहीयेत. ट्रम्प सध्या मध्य पूर्वच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी सीरियावर लादलेले सर्व निर्बंध उठवण्याची घोषणा केली अन् बुधवारी सकाळी सीरियन राष्ट्रपती अहमद अल-शारा यांचीही भेट घेतली. विशेष म्हणजे, अल-शाराला अमेरिकेने कुख्यात दहशतवादी घोषित केले असून, त्यांच्यावर दहा लाख डॉलर्सचे बक्षीस आहे.

अल-शारा हे सीरियन अतिरेकी संघटना हयात तहरीर अल-शामचा प्रमुख आहेत. याच संघटनेने सीरियातून बशर अल-असद यांना उलथवून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या संघटनेचाही अमेरिकेच्या बंदी यादीत समावेश आहे. दहशतवाद संपवण्याच्या नावाखाली मध्यपूर्वेतील अनेक देशांवर कारवाई करणारा अमेरिकेचा प्रमुख आज एका 'दहशतवाद्या'ला भेटतो, यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 25 वर्षांत सीरिया आणि अमेरिकेचे प्रमुख नेते एकमेकांना भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अल-शारांचा दहशतवादाशी दीर्घकाळ संबंध?अहमद अल-शारा यांना अबू मोहम्मद अल-जुलानी म्हणून ओळखले जाते. पण सीरियाच्या पतनानंतर त्यांनी अल-शारा नाव ठेवले आहे. ते हयात तहरीर अल-शामचा नेते असून, अनेक देशांनी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. त्यांना सीरियन संघर्षातील एक प्रमुख व्यक्ती मानले जाते. त्यांनीच एचटीएसला बशर अल-असदची राजवट उलथवून टाकण्यास मदत केली. केवळ एचटीएसच नाही, तर तो अल-कायदाशीही संबंधित आहे. एचटीएसला अल-कायदाची सीरियन शाखा म्हणून ओळखले जात असे. अल-शारावर इराकमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आहे.

अल-शारा स्वतःला उदारमतवादी दाखवतोसीरियामध्ये सत्ता हाती घेतल्यापासून अल-शारा स्वतःला उदारमतवादी म्हणून दाखवत आहे. ते पाश्चात्य नेत्यांसारखे सूट घालून सीरियाच्या विकासासाठी पाश्चात्य निर्बंध उठवणे आवश्यक असल्याचे म्हणतात. अल-शारांना सौदी आणि कतार सारख्या प्रमुख सुन्नी देशांचा पाठिंबा आहे. ट्रम्प यांना मध्यपूर्वेच्या या दौऱ्यातून अमेरिकेत मोठी गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळेच सौदीच्या राजकुमारांच्या दबावाखाली ट्रम्प यांनी अल शाराची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पSyriaसीरियाsaudi arabiaसौदी अरेबिया