अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची तब्बल सहा वर्षांनी भेट झाली. त्यांची ही भेट दक्षिण कोरियामध्ये झाली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांना हस्तांदोलन करून अभिवादन केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय चर्चा केली, जी सुमारे दोन तास चालली. ही बैठक दक्षिण कोरियातील बुसान येथे पार पडली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये जपानमधील ओसाका येथे त्यांची भेट झाली होती. मात्र, त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. मात्र, आता युद्ध रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही कौतुक केले.
डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्या या भेटीकडे जगाचे लक्ष आहे. कारण ट्रम्प यांनी चीनवर सर्वाधिक कर लादले होते आणि ते वाढवण्याची धमकी दिली होती. म्हणूनच जग दोन्ही नेत्यांमधील या भेटीकडे सकारात्मक नजरेने पाहत आहे.
बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले की, "आमची बैठक खूप यशस्वी होईल याबद्दल मला शंकाच नाही. शी जिनपिंग हे खूप वाटाघाटी करणारे आहेत. ही खरंतर चांगली गोष्ट नाही. पण, आम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखतो."
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला की, ते दक्षिण कोरियातील बुसान येथे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्यापार करार करण्याची योजना आखत आहेत का, तेव्हा ते म्हणाले, "ते होऊ शकते."
'या' मुद्द्यांवर झाली चर्चा
दोन्ही नेत्यांनी प्रामुख्याने व्यापार आणि शुल्क यावर चर्चा केली. ट्रम्प यांनी १ नोव्हेंबरपासून चिनी वस्तूंवर १००% टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे आणि चीनने अलीकडेच दुर्मिळ पृथ्वी सामग्री आणि संबंधित तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर कडक निर्बंध लादले आहेत.
२ तास चालली बैठक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील महत्त्वाची बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे दोन तास चालली. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर, ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट, वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक, चीफ ऑफ स्टाफ सुझी विल्स आणि चीनमधील अमेरिकेचे राजदूत डेव्हिड पेर्ड्यू हे होते.
Web Summary : Donald Trump and Xi Jinping met in South Korea after six years. Discussions, lasting two hours, focused on trade and tariffs. Trump hinted at possible trade deal. Both leaders acknowledged the need to de-escalate tensions.
Web Summary : डोनाल्ड ट्रम्प और शी जिनपिंग 6 साल बाद दक्षिण कोरिया में मिले। दो घंटे की बातचीत में व्यापार और शुल्क पर ध्यान केंद्रित किया गया। ट्रम्प ने व्यापार समझौते का संकेत दिया। दोनों नेताओं ने तनाव कम करने की आवश्यकता को स्वीकार किया।