शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

दोस्तीत कुस्ती; ट्रम्प आणि पुतिन यांची मैत्री होण्यापूर्वीच तुटली, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 17:50 IST

या दोन्ही देशांमधील तणावाचे जागतिक परिणाम पाहायला मिळू शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. पण, गेल्या काही काळापासून या दोन्ही नेत्यांमधील वाद कमी होत असल्याचे जाणवत होते. मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये असलेला राजकीय संघर्ष आता सार्वजनिक धमक्यांच्या पातळीवर पोहोचला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या अलीकडील विधानांवरुन दोस्तीत कुस्ती झाल्याचे स्पष्टपणे जाणवते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाला थेट इशारा दिला की, पुतिन आगीशी खेळत आहेत आणि त्याचा परिणाम खूप वाईट असू शकतो. हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा ट्रम्प प्रशासनाने रशियावर अधिक कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. यामध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.

तिसऱ्या महायुद्धापेक्षा वाईट...रशियाचे प्रत्युत्तररशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष आणि माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी ट्रम्पच्या धमकीला अतिशय कठोर स्वरात उत्तर दिले. ते म्हणाले की, जर अमेरिकेला असे वाटत असेल की, यापेक्षा वाईट काहीतरी घडू शकते, तर त्यांनी तिसऱ्या महायुद्धालाही तयार राहावे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, रशिया आणि अमेरिकेतील संबंध सुधारण्यापूर्वीच बिघडले आहेत. अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर रशियादेखील मागे हटण्याच्या मनःस्थितीत नाही. या दोन्ही महासत्त्यांच्या तणावाचे जागतिक परिणामही पाहायला मिळू शकतात.

पुतिन यांच्याशी भेटीसाठी उत्सुक होते ट्रम्परिपोर्ट्सनुसार, ट्रम्प अध्यक्ष झाल्यापासून पुतिन यांना वैयक्तिकरित्या भेटण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी किमान तीन वेळा भेटीसाठी मॉस्कोला प्रस्ताव पाठवला, परंतु प्रत्येक वेळी एकतर प्रतिसाद मिळाला नाही किंवा परिस्थितीचा हवाला देत रशियाने बैठक पुढे ढकलली. ट्रम्प यांना आशा होती की, पुतिन लवकरच त्यांच्यासोबत बसुन धोरणात्मक चर्चा करतील, पण आता तसे होताना दिसत नाही.

अमेरिकेचा शांततेच्या चर्चेतून माघार घेणारट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अनेक वेळा सांगितले होते की मी सत्तेत येताच, मी 24 तासांत रशिया-युक्रेन युद्ध थांबवेन. पण आता ते सत्तेत येऊन चार महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी परिस्थिती जैसे थे आहे. यामुळेच ट्रम्प शांतता चर्चेतून माघार घेण्याचा विचारही करत आहेत. या घटनांमुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे की, अमेरिका आणि रशिया धोरणात्मकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाrussiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पVladimir Putinव्लादिमीर पुतिन