शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्या भेटीची वेळ ठरली, 12 जून रोजी सिंगापूरमध्ये होणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 08:46 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतीक्षित भेटीची वेळ अखेर निश्चित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन 12 जून रोजी सिंगापूर येथे भेटणार आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतीक्षित भेटीची वेळ अखेर निश्चित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन 12 जून रोजी सिंगापूर येथे भेटणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून या भेटीचा माहिती दिली आहे. 12 जून रोजी मी आणि किम जोंग उन सिंगापूर येथे भेटणार आहोत. आम्ही या भेटीला जागतिक शांततेच्या दृष्टीकोनातून खास बनवण्याचा सर्वतोपरी  प्रयत्न करणार आहोत, असे ट्रम्प यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याआधी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि आपली बैठक उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर स्थित अशेल्या पीस हाऊसमध्ये होऊ शकते, अशी शक्यता ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी वर्तवली होती. मात्र त्या मुद्यावर एकमत होऊ शकले नव्हते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि दक्षिण कोरियाचे हुकूमशाह यांच्यातील ही पहिलीच शिखर बैठक असेल. त्यामुळे या भेटीकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.  काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचा हुकूम शाह किम जोंग उन याने दक्षिण कोरियाचा दौरा केला होता. त्यावेळी दोऩ्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोरियन द्विपकल्पात असलेला तणाव निवळण्यास मदत झाली होती. किमच्या दक्षिण कोरिया दौऱ्याकडे एक ऐतिहासिक घटना म्हणून पाहिले गेले होते. कारण  त्याआशी शस्त्रसज्जता वाढवण्यात गुंतलेल्या किमने दक्षिण कोरियाच नव्बहे तर अमेरिकेलाही हल्ले करण्याची धमकी दिली होती. मध्यंतरी उत्तर कोरियात किम यांनी ज्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या, त्यामुळे सारे जग हादरून गेले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंधही जाहीर केले होते. मात्र, चीनच्या मध्यस्थीनंतर किम यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण कोरियातही जाण्याचे ठरवले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग ऊन यांच्यातील भेटीचा मार्ग त्यामुळे खुला झाला होता.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पKim Jong Unकिम जोंग उनUnited Statesअमेरिकाnorth koreaउत्तर कोरिया