शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ गंभीर आरोप, दोषी ठरल्यास होणार अशी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 13:46 IST

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.  त्यांच्यावर पोर्नस्टारला गप्प राहण्यासाठी दबाव आणण्यासह एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.  त्यांच्यावर पोर्नस्टारला गप्प राहण्यासाठी दबाव आणण्यासह एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत. या आरोपांवर मंगलावीर मॅनहॅटन कोर्टामध्ये सुनावणी झाली. यावेळी ट्रम्प यांनी आपण पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा केला. तसेच २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहता येऊ नये म्हणून आपल्याला चुकीच्या पद्धतीने फसवण्यात येत असल्याचाही आरोप केला.   

दरम्यान, सुनावणी वेळी कोर्टाने ट्रम्प यांना सोशल मीडियावर समर्थकांच्या भावना भडकतील, असे काहीही न बोलण्याची ताकीद दिली आहे. जर त्यांनी असं काही केलं तर त्यांच्या सार्वजनिकपणे काहीही लिहिण्याबोलण्यावर बंदी घालण्यात येईल, असे सांगितले.

न्यूयॉर्कच्या जिल्हा अॅटॉर्नी एल्विस ब्रेग यांनी कोर्टामध्ये सुनावणीनंतर सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एकूण ३४ खोट्या वक्तव्यांवरून खटला दाखल करण्यात आला आहे. जर कोर्टाने ट्रम्प यांना सर्व आरोपंमध्ये दोषी मानले, तर त्यांना १३६ वर्षांची शिक्षा होऊ शकते. कारण सर्व गुन्ह्यांची शिक्षा एकत्र केल्यास ती  १३६ वर्षे एवढी होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर २०१६ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी पोर्नस्टार स्टार्मी डेनियल हिच्यासोबत रात्र घालवल्यानंतर तोंड बंद ठेवण्यासाठी १.३ लाख डॉलर दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय प्लेबॉय मॉडेल करेन मॅकडॉगल हिला नकारात्मक वृत्तांकन न करण्यासाठी १.१५ लाख डॉलर दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. एकंदरीत ट्रम्प यांच्यावर एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, मंगळवारी मॅनहॅटन जिल्हा अॅटॉर्नींच्या कार्यालयातून ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्याही फौजदारी प्रकरणामध्ये कुठल्याही माजी राष्ट्राध्यक्षांवर अटकेची कारवाई झाली आहे. ट्रम्प मॅनहॅटनमधील कोर्टामध्ये आत्मसमर्पण करण्यासाठी पोहोचले होते. तेव्हा त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय