शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत भारतीयांचे वर्चस्व! बोईंग डीलमुळे मोठा फायदा, मिळणार हजारो नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 09:16 IST

अमेरिकेतील केवळ एक चतुर्थांशजणांकडे पदवी आहे. दुसरीकडे, सुमारे २.५ लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी अमेरिकेत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतात.

नवी दिल्ली - अमेरिकेत पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी बोईंग कंपनीने एअर इंडियासोबत २.८१  लाख कोटी रुपयांचा (३४ अब्ज डॉलर) २२० विमानांचा करार केला आहे. या करारातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे  बायडेन यांनी मध्यमवर्गीयांना लक्षात घेऊन ४४ राज्यांमध्ये नवीन रोजगारासाठी महाविद्यालयीन पदवी अनिवार्य नसल्याचे म्हटले आहे. ही घोषणा अमेरिकन नागरिकांपेक्षा तिथे राहणाऱ्या भारतीयांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. 

याचे कारण म्हणजे अमेरिकन विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मागासलेपण. न्यू स्टॅनफोर्डच्या संशोधनानुसार, २०२२-२३ मध्ये १२वीपर्यंतच्या वर्गांमध्ये १२ लाख कमी प्रवेश झाले होते. अमेरिकेतील केवळ एक चतुर्थांशजणांकडे पदवी आहे. दुसरीकडे, सुमारे २.५ लाख भारतीय विद्यार्थी दरवर्षी अमेरिकेत चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करतात. नंतर त्यांना तेथेच नोकरी मिळते. बोईंग डीलद्वारे, बायडेन यांनी मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

भारत कुशल कर्मचाऱ्यांची गरज भागवतो कंपनीला एआय क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांची गरज आहे. बोईंगमध्ये ५०० अत्यंत कुशल अभियंते आणि २०० तांत्रिक कामगार यावर्षी निवृत्त होत आहेत. अमेरिकेतील इतर तंत्रज्ञान उद्योगातून बाहेर काढलेल्या भारतीयांनाच येथे रोजगार मिळत आहे.     - जेसिका केवेल, प्रवक्त्या, बोईंग

उत्पादन क्षेत्रात २१ लाख पदे रिक्तउत्पादन क्षेत्राबद्दल अमेरिकन लोकांचा भ्रमनिरास झाला आहे. डेलॉईट अभ्यासानुसार, २०३० पर्यंत अमेरिकन उत्पादन क्षेत्रात २१ लाख रिक्त पदे असतील. येथे भारतीय कुशल कर्मचाऱ्यांची संख्या गतीने वाढत आहे.

टीसीएसला आउटसोर्सिंगची जबाबदारीव्हर्जिनियातील कंपनी बोईंगच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी एचआर आणि फायनान्समधून २ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे. यापैकी एक तृतीयांश नोकऱ्या टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) कडून आउटसोर्स केल्या गेल्या आहेत. या कंपनीवर भारतीयांचे वर्चस्व आहे. बोईंगचे भारतातही ३,००० कर्मचारी आहेत. बोईंग पुरवठादारांसाठी ७ हजार भारतीय काम करत आहेत.

२ कोटी रुपयांचे पगाराचे पॅकेजएअर इंडियाने आपल्या ४७० नवीन विमानांसाठी भरती करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, बोईंग आणि एअरबसकडून विमानांची डिलिव्हरी घेण्यास तयार असलेल्या एअर इंडियाने विविध पदांसाठी भरती सुरू केली आहे. एअर इंडिया काही पदांसाठी वार्षिक २ कोटी रुपयांपेक्षा जास्त पगाराचे पॅकेजही देत आहे.

१६ लाख मुले अमेरिकेत २०२१-२२ दरम्यान शाळेत दीर्घकाळ गैरहजर होती. न्यूयॉर्क शहरातील सार्वजनिक शाळांमध्ये या दरम्यान ४१% मुले गैरहजर होती. ४०% पालक कोरोनानंतरही  शाळांमध्ये हायब्रीड-आधारित शिक्षण देण्यासाठी अनुकूल आहेत. ते मुलांना नियमित शाळेत पाठवत नसल्याचे एका अहवालात समोर आले आहे.

टॅग्स :IndiaभारतAmericaअमेरिका