नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसच्या बुकिंगची स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी पश्चिम आशियातील संघर्षामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध कायम असल्याने हॉटेल्ससह अनेक व्यावसायिक अद्यापही चिंताग्रस्त आहेत. युद्धापूर्वी स्वयंपाकाच्या गॅससाठी ग्राहक दररोज सरासरी सुमारे ५५ लाख सिलिंडर बुक करत होते. मात्र, इराणनेही प्रतिहल्ले चढविल्याने व सौदी अरेबिया, कतार, यूएईसारख्या आखाती देशांकडून होर्मुझच्या आखातातून जलमार्गे होणारी तेल, गॅस आणि एलपीजीची निर्यात कमी झाल्यामुळे देशातील ६० टक्के एलपीजी पुरवठ्यावर परिणाम झाला. त्यावर सरकारने व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी केला. त्याने नागरिकांनी घाबरून स्वयंपाकाच्या गॅसची मोठ्या प्रमाणावर आगाऊ नोंदणी सुरू केली.
देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ४०% हून वाढ -केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांत देशांतर्गत एलपीजी उत्पादनात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. देशात १८ मार्च रोजी ५६ लाखांहून अधिक बुकिंगच्या तुलनेत ५४.९१ लाख एलपीजी सिलिंडर वितरित करण्यात आले. १३ मार्च रोजी ६२.५ लाख आणि १४ मार्च रोजी ६० लाख सिलिंडर वितरित करण्यात आले. या दोन्ही दिवशी उच्चांकी बुकिंग झाले.
Web Summary : Cooking gas bookings are normalizing, but West Asia conflicts impact commercial cylinders. Hotels face supply worries. Domestic LPG production increased by 40%. Government assures sufficient LPG supply, but the situation remains tense for businesses.
Web Summary : रसोई गैस बुकिंग सामान्य हो रही है, लेकिन पश्चिम एशिया संघर्ष व्यावसायिक सिलेंडरों को प्रभावित करता है। होटलों को आपूर्ति की चिंता है। घरेलू एलपीजी उत्पादन में 40% की वृद्धि हुई। सरकार पर्याप्त एलपीजी आपूर्ति का आश्वासन देती है, लेकिन व्यवसायों के लिए स्थिति तनावपूर्ण बनी हुई है।