शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

म्यानमारच्या नेत्या आंग सान सू ची यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 18:11 IST

म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्याबद्दल आपण नेहमी वाचत असतो. 72 वर्षांच्या सू ची यांचे आयुष्य अनेकविध घटनांनी व चढउतारांनी भरलेले आहे.

मुंबई, दि. 5 -  म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्याबद्दल आपण नेहमी वाचत असतो. 72 वर्षांच्या सू ची यांचे आयुष्य अनेकविध घटनांनी व चढउतारांनी भरलेले आहे. त्यापैकी महत्त्वाच्या घडामोडींमधून त्यांचा जीवनप्रवास समजू शकेल.1) आंग सान सू ची यांचे वडिल आंग सान हे म्यानमारचे पितामह म्हणून ओळखले जातात तसेच त्यांना म्यानमारच्या स्वातंत्र्याचे शिल्पकारही म्हटले जाते. क्रांतीकारी वृत्तीचे आंग सान 1948 ते 47 असे ब्रिटिश क्राऊन कॉलनी ऑफ बर्माचे प्रमुख होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले असले तरी त्यांना ब्रह्मदेश स्वतंत्र झालेला पाहता आला नाही. स्वातंत्र्यापुर्वी 6 महिने आधीच त्यांची हत्या करण्यात आली.2) आंग सान सू ची यांचा जन्म 19 जून 1945 रोजी रंगूनमध्ये झाला. 1960 मध्ये त्या आईबरोबर भारतात आल्या. त्यांची आई डॉव खिन क्यी यांची म्यानमारच्या नेपाळ व भारतामधील राजदूतपदावरती नेमणूक झाली होती.

3) भारतामध्ये आंग सान यांनी नवी दिल्लीमधील कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लेडी श्रीराम महाविद्यालयामध्ये राज्यस्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सेंट ह्युज महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये बी.ए पदवी मिळवली आणि राज्यशास्त्रात एम.ए पदवी संपादित केली. त्यानंतर त्यांनी एम. फिल पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर सू ची यांनी संयुक्त राष्ट्रासाठी तीन वर्षे काम केले.

4) त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या डॉ. मायकेल एरिस यांच्याशी त्या 1 जानेवारी 1972 रोजी विवाहबद्ध झाल्या. डॉ. एरिस हे तिबेटीयन संस्कृतीचे अभ्यासक आणि भूटानच्या राजघराण्यातील मुलांचे शिक्षक होते. 1973 साली या दाम्पत्याला अलेक्झांडर आणि 1977 साली किम ही अपत्ये झाली.

5) 1988 साली आईची काळजी घेण्यासाठी सू ची म्यानमारमध्ये परतल्या मात्र लष्करशाहीने पोखरलेल्या मायदेशामध्ये लोकशाहीसाठी काम करण्याचे त्यांनी ठरवले व सरकारच्या विरोधातील प्रमुख आवाज म्हणून त्यांनी अल्पावधीत स्वतःचे स्थान निर्माण केले.

6) मायकल यांच्याशी त्यांची 1995 साली शेवटची भेट झाली.एरिस यांना कर्करोग झाल्यामुळे त्यांना म्यानमारमध्ये जाण्याची किंवा सू ची यांना देशाबाहेर जाण्याची परवानगी हवी होती. मात्र सू ची यांना तेथिल सरकारने परवानगी दिली नाही. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोफी अन्नान तसेच पोप जॉन पॉल दुसरे यांनी विनंती करुनही म्यानमार सरकारने एरिस यांना व्हीसा दिला नाही.

7) 1989 साली प्रथम सू ची यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. म्यानमारमध्ये आल्यानंतर 21 वर्षांपैकी 15 वर्षे सू ची यांनी नजरकैदेत घरातच काढली. एरिस यांचा 1999 साली ऑक्सफर्डमध्ये वयाच्या 53 व्या वर्षी मृत्यू झाला.

8)13 नोव्हेंबर 2010 रोजी सू ची यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. आज सू ची म्यानमारच्या पहिल्या स्टेट कौन्सिलर बनल्या असून हे पद पंतप्रधानांसारखेच आहे. तसेच त्या देशाच्या परराष्ट्रमंत्रीही आहेत.

9) आंग सान सू ची यांना देशविदेशातील विविध सन्मान मिळाले नोबेल, राफ्टो, साखरोव, जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड, सायमन बोलिव्हॉं प्राईझ, ऑलोफ पामे प्राईझ, भगवान महावीर वर्ल्ड पीस, कॉंग्रेशनल गोल्ड मेडल अशा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

10) म्यानमारमधील वांशिक तणाव कमी होऊन रोहिंग्यांचा प्रश्न शांततेत सोडवावा, रोहिंग्यांवरील अन्याय दूर केला जावा यासाठी आंग सान सू ची यांच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवरुन दबाव येत आहे.