शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला माहित आहे का ? या देशाने पहिल्यांदा महिलांना दिला मतदानाचा अधिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 19:41 IST

न्यूझीलंड हा जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश. आपण या देशाला ओळखतो ते क्रिकेटमुळे.

ठळक मुद्देकाही देशांमध्ये अलीकडच्या काहीवर्षात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.

नवी दिल्ली, दि. 19 - न्यूझीलंड हा जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश. आपण या देशाला ओळखतो ते क्रिकेटमुळे. पण क्रिकेटव्यतिरिक्त सामाजिक सुधारणांच्या बाबतीत न्यूझीलंड एक पुढारलेला देश आहे. जगातल्या काही देशांमध्ये अलीकडच्या काहीवर्षात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. पण महिलांना मतदानाचा अधिकार देणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश आहे. 19 सप्टेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 

राज्यपाल लॉर्ड ग्लासगो यांनी महिलांना मतदानाचा अधिकार देणा-या विधेयकावर स्वाक्षरी केली. महिलांना हा अधिकार देण्यापूर्वी न्यूझीलंडमध्ये मोठया प्रमाणावर चर्चा, मंथन झाले त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. नोव्हेंबर 1893 मध्ये राष्ट्रीय निवडणुकीत न्यूझीलंडमधल्या महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. अमेरिका हा जगातील सर्वात प्रगत देश.  अमेरिकेने 1920 साली महिलांना मतदानाचा अधिकार दिला. 

जगावर राज्य करणा-या इंग्लंडमध्ये 1928 साली महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारताने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी 1950 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार दिला. तेल संपन्न सौदी अरेबियामध्ये दोनवर्षांपूर्वी 2015 मध्ये महिलांनी पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले. 

इंग्लंडची दुसरी राणी एलिझाबेथ ही या देशाची प्रमुख

न्यूझीलंड हा अगदी पिटुकला देश. लोकसंख्या आहे ४६,०४,८७१. न्यूझीलंडच्या नागरिकांना तसेच ‘पीआर’ म्हणजे पर्मनंट रेसिडेंट असलेल्या व १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीला मतदान करता येते. मतदान करणे सक्तीचे नसले तरी २०१४च्या निवडणुकीत ९२.६टक्के लोकांनी नाव नोंदणी केली व त्यापैकी ७७.९ टक्के लोकांनी मतदान केले होते. निवडणुका दर तीन वर्षांनी होतात.

न्यूझीलंड सरकार हे फक्त ‘हाउस आॅफ रिप्रेझेंटेटिव्हज’ या एकाच चेंबरचे बनलेले असून, त्यात १२० मेंबर आॅफ पार्लमेंट असतात. या देशाची घटना अलिखित असून, न्यूझीलंडची राणी म्हणजे इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) ही या देशाची प्रमुख आहे. देशासंबंधीचे सर्व अधिकार राणीच्या वतीने गव्हर्नर जनरलला असतात.

प्रत्येक मतदाराला दोन मते देता येतात - एक राजकीय पक्षाला व दुसरे स्थानिक उमेदवाराला. राजकीय पक्षाला एकूण मतांपैकी किती टक्के मते मिळाली त्या प्रमाणात १२० पैकी जागा मिळतात. उदा. एखाद्या राजकीय पक्षाला ३० टक्के मते मिळाली तर एकूण १२०पैकी ३६ जागा त्यांना मिळतील.