शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात गरीब राष्ट्राध्यक्षाबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 11:07 IST

हे राष्ट्राध्यक्ष आपल्या पगारातील 90 टक्के रक्कम दान करुन टाकायचे.

माँटेव्हिडिओ- साधी राहणी उच्च विचारसरणी अशी जडजड वाक्यं फेकून जगभरातील नेतेमंडळी आपण किती साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. एखाद्या नेत्याला रांगेत उभं राहावं लागलं किंवा एखाद्या नेत्याने स्वतः गाडी चालवली तर भारतीयांना ते आश्चर्य वाटतं. पण आपल्या जगात एका देशाचे राष्ट्राध्यक्ष खरोखर अत्यंत साधे जीवन जगायचे त्यांच्या देशाचा कारभारही चांगल्या पद्धतीने चालवत असत. 2015 साली राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यानंतरही त्यांच्या साधेपणात काही कमी झालेले नाही.  विशेष म्हणजे त्यांच्या वागण्यात कोठेही तुम्ही सर्वांनी माझ्याप्रमाणे साधेपणानेच वागलं पाहिजे असा आग्रह नसून 'हा मी निवडलेला पर्याय आहे 'असा भाव असतो.

हे आहेत उरुग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष जोस म्युजिका. जोस वर्षाला केवळ १२ हजार डॉलर इतके वेतन घ्यायचे आणि त्यातील ९०% रक्कम दान देऊन टाकायचे.  उरुग्वेचे ते ४० वे अध्यक्ष होते. जोस हे कधीही राष्ट्रपती भवनामध्ये राहिले नाहीत. पत्नीबरोबर ते एका अत्यंत साध्या फार्महाऊससारख्या घरात राहायचे. ते कोणत्याही प्रकारचा मोटारींचा ताफा वापरत नसत. एका पिटुकल्या गाडीमधूनच ते प्रवास करुन आपली कामे व जबाबदाऱ्या पार पाडत. ही गाडी १९८७ साली तयार केलेली असून जोस स्वतःच ती चालवतात. 

जोस पती पत्नी यांची एकत्रित संपत्ती केवळ २ लाख १५ हजार डॉलर इतकी आहे. जोस यांंच्या मते ते गरिब नाहीत. जे लोक महागडी जीवनशैली मिळवण्यासाठी पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत स्वतःला अडकवतात ते गरिब असं त्यांचं मत आहे. पैसे मिळवण्यासाठी अनेक प्रकारची कामं एकाचवेळी करत राहिल्यामुळे स्वतःसाठी फारच कमी वेळ मिळतो. मी पत्करलेला मार्ग यातून स्वातंत्र्य मिळवून देणारा आहे असे जोस म्हणतात.

टॅग्स :UruguayUruguayPresidentराष्ट्राध्यक्ष